केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना पितृशोक

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   प्रशासकीय यंत्रणेत बीडीओ म्हणून सेवानिवृत्त होत आपल्या कामाचा जनसामन्यावर ठसा उमठीविणारे ज्येष्ठ नागरीक नामदेव सूर्यवंशी याचे वयाच्या ८९ व्या वर्षी गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या दुख:द् निधाने समाजातील तळागाळापासून सर्वच स्तरातीलवर्गातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे वास्तव्य नाशिक येथील देवळा येथे होते.


           ते कल्याण डोंबिवली महापलिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यंवंशी यांचे वडिल होते. त्यांच्या जाण्याने सूर्यवंशी कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थीत होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments