नविन मतदार नाव नोंदणीसाठी महाविदयालयांचे सहकार्य आवश्यक - अतिरिक्त आयुक्त सुनिल पवारकल्याण , कुणाल म्हात्रे  :  १ नोव्हेंबर  ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदार यादी पुनरीक्षण अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने १ जानेवारी २०२२  रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होणा-या विदयार्थी / विदयार्थिनींच्या नावांची नोंद मतदार यादीत घेण्यासाठी महाविदयालयांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यासाठी सर्व महाविदयालयांनी महापालिकेस सहकार्य करावेअसे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी आज महापालिका क्षेत्रातील महाविदयालयां समवेत संपन्न झालेल्या बैठकीत केले.


महापालिका परिसरात सुमारे २९ हजार महाविदयालयीन युवक/युवती आहेत. यामध्ये मतदार यादीत नोंद नसलेल्या मतदारांचीमतदार यादीत नोंद करणेकामी महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयांच्या नागरी सुविधा केंद्रात नोंदणी अर्ज उपलब्ध करुन दिले जातील तसेच महापालिका परिसरातील महाविदयालयांमध्ये देखील हे नोंदणी अर्ज महापालिकेमार्फत उपलब्ध करुन दिल्यानंतर संबंधित महाविदयालयाने ते भरून दिल्यानंतर ते संकलित करण्याचे कामही महानगरपालिकेच्या कर्मचारी वर्गामार्फत केले जाईल परंतू महाविदयालयातील विदयार्थ्यांकडून हे अर्ज भरुन घेणेकामी महाविदयालयांनी त्यांचे स्तरावर एका नोडल अधिका-याची नेमणूक करावीअसेही आवाहन महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी यावेळी केले.


१०० टक्के नाव नोंदणी करणा-या महाविदयालयाला राज्य निवडणूक आयोगाकडून तसेच महापालिकेकडून सन्मानपत्र देवून गौरविले जाणार आहेअसेही त्यांनी यावेळी सांगितले. नोव्हेंबरमध्ये होणा-या या मतदार नोंदणी पुनरीक्षण अभियानात मतदार यादीत नाव नोंदविण्या बरोबरच मतदारांच्या नावांची / पत्‍त्याची दुरुस्ती करणेही शक्य होणार आहे.मतदार नोंद जनजागृतीसाठी महापालिकेतर्फे महाविदयालयांना बॅनर्सहोर्डिंग्ज तसेच जिंगल्स या स्वरुपात‍ जनजागृतीचे साहित्य उपलब्ध करुन दिलेजाणार असून त्याकामी देखील महाविदयालयांनी सहकार्य करावे असे निवेदन अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी यावेळी केले.


१ नोव्हेंबर रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर तसेच सर्व मतदार नोंदणी कार्यालयामध्ये प्रारुप मतदार यादी प्रकाशित केली जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. या बैठकीत महापालिका सचिव संजय जाधव व सुमारे १६ महाविदयालयाच्या प्रतिनिधिंनी सहभाग दर्शविला आहे.

Post a Comment

0 Comments