Header AD

मनसे आमदार राजू पाटील यांची गणेश मंदिरात आरती

 



कल्याण , प्रतिनिधी  : डोंबिवलीतील प्रसिद्ध श्री गणेश मंदिर सकाळी भाविकांसाठी खुले करण्यात आले.  मनसे आमदार राजू पाटील यांनी मनसैनिकां सोबत गणेश मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेतले. त्यानंतर दुर्गा पूजा करत आरती केली.



 यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की, कोणत्याही पक्षाची नाही तर जनभावना लक्षात घेता मंदिर उघडण्याची मागणी होत होती. उशिरा का होईना पण सरकारला जाग आलीमंदिर उघडली त्याबद्दल सरकारचे आभार मानतो. तर राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याची भरपाई सरकारने दयावी.



 त्वरित पंचनामे करावेपंचनाम्याच्या आधी ही शेतकऱ्यांना काही रक्कम दयावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या वेळी शहर अध्यक्ष मनोज घरतमहिला शहर अध्यक्ष मंदा पाटील, कोमल पाटीलविधार्थी सेना शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे उपस्थित होते.

मनसे आमदार राजू पाटील यांची गणेश मंदिरात आरती मनसे आमदार राजू पाटील यांची गणेश मंदिरात आरती Reviewed by News1 Marathi on October 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads