करोनातून वाचले आता खड्डे जीव घेणार घेतली का ? निकृष्ट दर्ज्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा भाजप माजी नगरसेवकाची मागणी
डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीतील रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहनचालक खड्यात पडून जखमी होत असल्याच्या घटना घडत आहेत.अश्या घटना घडू नये याकरता भाजपने पालिका प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना रस्त्यावर पडलेले खड्डे नागरिकांचा जीव घेतील का ? असा प्रश्न उपस्थित करत निकृष्ट दर्ज्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक निलेश म्हात्रे यांनी केला आहे.

 


          डोंबिवली पूर्वकडील मानपाडा रोडवरील स्टार कॉलिनी जुना जकात नाका ते आईस फॅक्ट्ररी पर्यतच्या रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी पालिका प्रशासनाने रस्त्यावर डांबरीकरण केले होते. मात्र या रस्त्याच्या काही भागात खडीकरण केल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक निलेश म्हात्रे यांनी केला आहे. सोमवारी दुपारच्या दरम्यान माजी नगरसेवक म्हात्रे, डोंबिवली ग्रामीण मंडळ महिला अध्यक्षा सुहासिनी राणे यांसह कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी माजी नगरसेवक निलेश म्हात्रे म्हणाले, निकृष्ट दर्ज्याचे काम केले असून काही ठिकाणी फक्त खडीकरण केले आहे.सोमवारी सकाळपासून तीन दुचाकीस्वार या खडीकरणावर घसरून पडल्याने किरकोळ जखमी झाले होते.
            त्यामुळे या या रस्त्यावर निकृष्ट दर्ज्याचे काम करणाऱ्या मे. जय हिंद रोड बिल्डर या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. डोंबिवली ग्रामीण मंडळ महिला अध्यक्षा सुहासिनी राणे यांनी पालिका प्रशासनाच्या अश्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली.याबाबत उपअभिय्नता रोहिणी लोकरे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, मे. जय हिंद रोड बिल्डर या ठेकेदाराला `ग` प्रभागातील रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीसाठी निय्मापामाने ठेका देण्यात आला आहे. ठेकेदाराने मानपाडा रोडवर रस्ता दोन दिवसांपूर्वी डांबरीकरण केले होते. 
           एकूण ९२० चौरसमीटर रस्त्यावर डांबरीकरण झाले आहे. मात्र स्टार कॉलिनी जुना जकात नाका ते आईस फॅक्ट्ररी पर्यतच्या रस्त्यावर एका बाजूला फक्त ३० चौरसमीटर रस्त्यावर ओलावा असल्याने डांबरीकरण व्यवस्थित झाले नाही. याबाबत ठेकेदाराला सदर ठिकाणी पुन्हा डांबरीकरण करण्यास सांगितले आहे.आज ज्या ठिकाणी डांबरी व्यवस्थित झाले नाही तेथे डांबरीकरण केले जाणार आहे.

Post a Comment

0 Comments