नूतन ज्ञानमंदिर शाळेच्या वतीने "गौरव दुर्गांचा"
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  छत्रपती शिक्षण मंडळ संचलितकल्याण पूर्वेतील नूतन ज्ञानमंदिर शाळेचा "समाजबांधिलकीचा दुर्वांकुर" उपक्रमांतर्गत "गौरव दुर्गांचा"हा उपक्रम कोळसेवाडी पोलीस स्टेशन कल्याण पूर्व येथे आयोजित करण्यात आला होता.स्त्रीच्या स्त्रीत्वाचा सन्मान या नवरात्र  निमित्त  नूतन ज्ञान मंदिर शाळेतील महिला शिक्षकांनी कोळसेवाडी पोलीस स्टेशन मधील महिलां पोलिसांची ओटी भरून त्यांच्या कार्यास गौरवविले. समाज रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या २४ तास तत्पर अशा या महिलां या नवदुर्गाचे रूप आहे.  या नवदुर्गां सर्वरूपात  सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी सदैव जागृत असतात. तसेच समाजातील सण उत्सव व्यवस्थित पार पडावेत यासाठी स्वतः त्या हे सण साजरे करण्यास बगल देऊन समाजाच्या आनंदात सहभागी होऊन ते सण साजरे करतात. दुसर्‍याच्या आनंदात आपला आनंद साजरा करतात अशा या मुर्त देवी स्वरूप महिलांच्या कार्यास नूतन ज्ञान मंदिर शाळेकडून मानाचा मुजरा,सलाम करण्यात आला. स्त्री ने स्त्रीचा केलेला हा गौरव संपूर्ण महिला वर्गासाठी प्रेरणादायी ठरावा. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक"असावा व त्यांना वेळोवेळी समाजाकडून मोलाचे सहकार्य मिळावे हा "समाजबांधिलकीचा दुर्वांकुर" आहे. या कार्यक्रमास कोळसेवाडी पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस अधिकारी नीता भोईगडे व त्यांच्या सहकारी महिला पोलीस कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होत्या. कार्यक्रम राबवण्यास प्रोत्साहन व प्रेरणा देणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी गागरे तसेच शाळेचे उपमुख्याध्यापक निकुम सर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा' समाज बांधिलकीचा दुर्वांकुर हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.

Post a Comment

0 Comments