भिवंडीत दरोडा, चोरी घरफोडींच्या गुन्ह्यातील फरार सराईत 'राजा किडा' गजाआड ..
भिवंडी दि 2  ( प्रतिनिधी ) ठाणे जिल्ह्यातील अनेक शहराच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत  चोरी घरफोडीचे सत्र सुरूच आहे. त्यातच  दरोडा, चोरी, घरफोडींच्या गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगार  'राजा किडा' उर्फ नासीर यासिन शेख ( वय ५२ ) याला सापळा रचून  पडकण्यात  कोनगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकला यश आले आहे. राजा किडा ६ वर्षांपासून पोलिसांना देत होता गुंगारा ... 

 

       सराईत गुन्हेगार राजा किडा हा कल्याण पश्चिम भागातील रेतीबंदर परिसरात असलेल्या हमालवाडीतील एका चाळीत राहतो. त्याच्या नावे आतापर्यत ४ गंभीर गुन्हे डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात २०१५ सालपासून दाखल आहे.  कोनगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे पथकातील  पोलीस उप निरीक्षक, पराग भाट व  त्यांचे पथक पोलीस ठाण्याच्या हद्दीत  गुन्हे वॉच पेट्रोलिंग करीत होते. 
       त्यावेळी पथकाला  गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत  दरोडा व जबरी चोरी सारखे गंभीर गुन्हे करून फरार असलेला  गुन्हेगार  नासीर  उर्फ राजा किडा हा  कल्याण - भिवंडी रोडवरील कोनगाव मधील  शिवसेना शाखेजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीनुसार  काही वेळानंतर सदर ठिकाणी गुन्हेगार येवुन संशयीतरित्या थांबला होता. 

 

सापळा रचून शिताफीने घेतले ताब्यात..


 
           वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गणपतराव पिंगळे,  पोलीस निरीक्षक ( गुन्हे) राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक, पराग भाट, सहा.  पोलीस उप निरीक्षक, सुर्यवंशी, पो.हवा, शिंदे, मोरे,  पवार,  चोरगे, गोरे,  महाले,  जाधव व अविनाश पाटील या पोलीस पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले. त्यांनतर रामनगर पोलीस ठाण्यात संपर्क साधुन राजा किडा या गुन्हेगाराला त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर  रामनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments