केडीमसीसह राज्यात निवडणुका महाविकास आघाडी सोबतच : जयंत पाटील कल्याणात राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयाचे उदघाटन
कल्याण , कुणाल म्हात्रे  : येत्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनाराष्ट्रवादी व काँग्रेस महाविकास आघाडी होईल काया प्रश्नावर उत्तर देताना पाटील यांनी आम्ही एकत्र सरकारमध्ये काम करतोयएकत्र सरकारमध्ये राहायचं आणि वेगळं वागायचं अस आमचं धोरण नाहीमहाविकास आघडीमधील पक्ष जिथे जिथे एकत्रीत राहतील त्याला प्राधान्य देऊ असे उत्तर जयंत पाटील यांनी दिले. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील सोमवारी कल्याणात जिल्हा कार्यालयाच्या उदघाटन व कार्यकर्ता मार्गदर्शनासाठी आले होते त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी गृहनिर्माण महाराष्ट्र राज्य मंत्री जितेंद्र आव्हाडराष्ट्रवादी कल्याण जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शिंदेप्रदेश प्रवक्ता महेश तपसे, जिल्हा कार्याध्यक्ष वंडार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 
त्याचबरोबर एकेकाळी कल्याण डोंबिवली महापालिकेत राष्ट्रवादीचा महापौर होत. मधल्या काळात अनेक घटना घडल्या. आता अप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम सुरू आहे. त्यामुळे पुन्हा उभारी येईल असे त्यांनी सांगितले. कल्याण डोंबिवलीच्या रस्त्याची दुरवस्था झालीदुरावस्तेमुळे अनेक अपघात ही घडले. याला तत्कालीन सरकार जबाबदार आहे. या रसत्यना प्राधान्य देऊ आणि ते प्रश्न सोडवू असे पाटील म्हणाले.पप्पू कलानीबाबत पत्रकारानी जयंत पाटील यांना प्रश्न विचारले असतात्यांनी सांगितले कीत्यांच्या समाजाचा सण होतात्यानिमित्ताने त्यांना भेटलो आणि जेवण केले. राजकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे पाटील सांगितले. दरम्यान कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेल्या मंत्री आणि पदाधियकऱ्यांच्या गर्दीमुळे कल्याणकर नगरिकाना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून स्टेशनकडे जाण्यासाठीचा सरळ मार्ग काही काळ थांबवून तो सहजानंद चौकातून पुन्हा महाराज चौकातून स्टेशन परिसरात वळवण्यात आली होती. त्यामुळे नगरीकांनी संताप व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments