माजी आमदार कांती कोळी यांचे निधन

 ठाणे , प्रतिनिधी  : काँग्रेसचे माजी आमदार कांती कोळी यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी रात्री ठाण्यातील महागिरी कोळीवाडा येथील राहत्या घरीच निधन झाले.त्यांचे मृत्यूमयी वय ७५ वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले- सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.            ठाण्याची नगरपालिका अस्तित्वात असताना, ते एक वेळ नगरसेवक पद भूषविले. 1986 साली ठाणे महापालिकेची स्थापना झाली. यापूर्वी  सन 1980 ते 1990 या कालावधीत ते काँग्रेस पक्षाचे सलग दहा वर्ष आमदार म्हणून दोन वेळा निवडून आले होते. ठाणे शहरात काँग्रेस पक्ष वाढविण्यात त्यांनी मोठा हातभार लावला.             तसेच त्यांना मानणारा शहरात काँग्रेसचा एक वर्ग आहे. गेल्या दिवसांपासून त्यांची प्रकृती खूप खालावली होती.ते उपचाराला ही साथ देत नव्हते. अखेर गुरुवारी रात्री त्यांच्या राहत्या घरीच त्यांची प्राणज्योत मावळली.             त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्या सारखी पसरल्यावर त्यांच्या घराकडे काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने धाव घेतली होती.शुक्रवारी दुपारी त्यांच्यावर ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments