सन टीव्ही नेटवर्क लिमिटेड सादर करत आहे त्यांची नव्या रुपातली मराठी मनोरंजन वाहिनी सन मराठी सोहळा नात्यांचा■प्रेक्षकांसाठी घेऊन येतेय 'बघा रोज जिंका रोख' ही  स्पर्धा ज्यात दररोज १०००हुन अधिक प्रेक्षकांना मिळणार संधी रोख २ कोटींपर्यंत बक्षिसं जिंकण्याची; सोबत दाखवणार आहेत ६ नव्या मालिका.....


मुंबई, १८ ऑक्टोबर २०२१:  ह्या सणासुदीला सन टीव्ही नेटवर्क लिमिटेड  मराठी प्रेक्षकांसाठी १७ ऑक्टोबर पासून महाराष्ट्रभर सुरु करत आहे नव्या रुपातली  मराठी मनोरंजन वाहिनी 'सन मराठी'.           ह्या वाहिनीचं टॅगलाईन  आहे 'सोहळा नात्यांचा'. ह्या टॅगलाईन शी सुसंगत राहून वाहिनीने संध्याकाळी ६.३० ते रात्री ९. ३० ह्या तीन तासांत  ६ नव्या मालिका सुरु  करण्याचा निर्णय घेतला आहे.  ह्यातली प्रत्येक मालिका  खूप वेगवेगळ्या प्रकारची नाती हाताळते. सन मराठीवर संध्याकाळी ६.३० वाजता नंदिनी, ७ वाजता सुंदरी, ७.३० वाजता जाऊ नको दूर…बाबा!, ८ वाजता आभाळाची माया, ८.३० वाजता कन्यादान तर रात्री ९ वाजता संत गजानन शेगावीचे ह्या मालिका दाखविल्या जाणार आहेत.           सन मराठी वाहिनीवर निव्वळ ह्या मालिकाच दाखवण्यात येणार नाही आहेत तर वाहिनीने खास प्रेक्षकांसाठी 'बघा रोज जिंका रोख' ही  स्पर्धा सुद्धा आयोजित केली आहे. दसरा ते दिवाळीच्या काळात  ह्या स्पर्धेदरम्यान दररोज १००० हुन अधिक प्रेक्षकांना रोख २ कोटी रुपयांची बक्षीसं मिळवण्याची संधी मिळणार आहे. प्रेक्षकांना स्पर्धेदरम्यान दररोज प्रत्येक मालिकेत  एक  प्रश्न विचारला जाईल. त्यांना त्या प्रश्नाचे अचूक  उत्तर कार्यक्रमादरम्यान दाखवल्या जाणाऱ्या  फोन नंबरवर मिस कॉल देऊन नोंदवायचे आहे.  


    

             सन मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या वेगवेगळ्या मालिका आपल्याला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतात घेऊन जातात. शहरी आणि ग्रामीण महाराष्ट्रातील राहणीमान, तेथील संस्कृती आणि विविधता यांचा सुरेख मिलाप आपल्याला या मालिकांमध्ये पहायला मिळेल.             मराठी माणूस हा नेहमीच प्रेरणादायी, महत्वकांशी आणि पुरोगामी असला तरीही आपली संस्कृती आणि परंपरेशी त्याची नाळ अजूनही तुटलेली नाही. आभाळाला गवसणी घालणारा मराठी माणूस आपले पाय मात्र जमिनीवर घट्ट रोवून असतो. सन मराठी वाहिनीवर देखील याच संस्कृतीचं दर्शन घडेल.            पदार्पणातच वाहिनीवर नव्या आणि जुन्याचा सुरेख मेळ घातला आहे. या क्षेत्रात अत्यंत अनुभवी आणि जनमानसात प्रसिद्ध अभिनेता अविनाश नारकर, पूर्वा गोखले, ऋजुता देशमुख, आस्ताद काळे, अशोक फळदेसाई, अमित पाठक आणि आशय कुलकर्णी यांच्यासोबतच दक्षता जोईल, आरती बिराजदार, अमृता बने, अनिषा सबनीस, मयुरी कापडणे, आद्वैत कडणे असे काही नवे चेहरे आपल्या भेटीसाठी येत आहेत.


नंदिनी


नंदिनी ही एक सूड कथा आहे. अरुण राजशेखर च्या घराण्याला मिळालेल्या शापाची कथा आहे. नंदिनी आणि गंगा या दोन जुळ्या बहिणींची कथा आहे. गंगा मानवी देहातील तर नंदिनी नागिण. शाप आणि उश्शापाची उत्कंठावर्धक कथा म्हणजे 'नंदिनी'.


सुंदरी

सुंदरी ही गावातली लौकिक दृष्ट्या सुंदर नसलेली, पण मनाने मात्र अतिशय निर्मळ असलेली गोड, अवखळ मुलगी. तिचं  स्वप्न खूप शिकून कलेक्टर होण्याचं, गावकरयांना मदत करण्याचं. सुंदरीचं मानते कि, मन सुंदर असलं कि जगणं सुंदर होतं.


जाऊ नको दूर...  बाबा!

ही बाप लेकीच्या नात्याची कथा.


एक लेक जी जन्मतःच आपल्या आईला गमावते आणि बापाच्या ही प्रेमाला पारखी होते. तिची सततची धडपड बाबाचं  प्रेम मिळवण्याची. तिचं  हे स्वप्न पूर्ण होईल का? बाबा तिला आपली लेक म्हणून स्वीकारेल का?


आभाळाची माया


आई वडिलांच्या पश्चात एकमेकांचं विश्व असलेल्या, एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या बहिण भावाची ही कथा. भावा बहिणीचं  अतूट नातं, त्यातील वेगवेगळे कंगोरे दाखवणारी ही ग्वाड कथा... 'आभाळाची माया'


कन्यादान


एक कर्तव्यनिष्ठ पिता आणि आणि त्याच्या मुली यांची ही कथा.

असं म्हणतात, कन्यादान केल्यानंतर बापाची जबाबदारी संपते. पण खरंच मुलगी माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी गेल्यानंतर बापाची जबाबदारी संपते???


संत गजानन शेगावीचे


गजानन महाराज हे दत्तात्रेय परंपरेतील भारतीय गुरु होते. त्यांना श्री गणेश यांचा अवतारही मानले जाते.


मालिकेत गजानन महाराजांच्या विविध लीलांचा आणि भक्तांवर केलेल्या त्यांच्या कृपेचा म्हणजेच त्यांच्या अवतारकार्याचा आढावा घेण्यात आला आहे.


सन मराठी हि  वाहिनी सर्व DTH प्लॅटफॉर्म्स आणि केबल नेटवर्क्सवर मोफत उपलब्ध आहे.


   

           सन टीव्ही नेटवर्क लिमिटेड विषयी : १९९३ साली स्थापन झालेले सन टीव्ही नेटवर्क हे भारताच्या मनोरंजन क्षेत्रातिल एक अग्रगण्य नाव आहे. सन टीव्ही नेटवर्क भारतात ३३ टेलिव्हिजन वाहिन्या चालवते आणि जवळपास ९. ५ कोटी भारतीय घरात पोहोचते. ह्या सर्व वाहिन्या अमेरिका, कॅनडा, युरोप, मध्य पूर्व आशिया, सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका , दक्षिण आफ्रिका,ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सह जगभरात सर्वत्र दिसतात.          हा समूह तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम ह्या चार दक्षिण भारतीय भाषांमध्ये संगीत, बातम्या, मनोरंजन, चित्रपट, विनोद आणि लहान मुलांसाठी अश्या वेगवेगळ्या genre मधल्या वाहिन्या दाखवतं.  ह्या SD  वाहिन्यांशिवाय सन टीव्ही नेटवर्कने दक्षिण भारतात ८ HD वाहिन्यादेखील सुरु केल्या आहेत.टीव्ही चॅनेल्स सोडून, ह्या समूहाची  RED FM आणि सूर्यन  FM  ह्या नावांखाली ६८ fm रेडिओ स्टेशन्स आहेत ; शिवाय ३ वर्तमानपत्रे, आणि ६ मासिकेदेखील  आहेत.


         

           SUN Direct ह्या नावाने प्रसिद्ध असलेली DTH सेवा हि देशातील एक अग्रगण्य सेवा आहे जीचे  देशात १.६ कोटी सभासद आहेत. सन टीव्ही नेटवर्कचे SUN Pictures ह्या चित्रपट निर्माण आणि प्रसारण बॅनरखाली चित्रपट क्षेत्रातही अस्तित्व असून त्यांचे खूप चित्रपट व्यावसायिक रित्या तसेच समीक्षेच्या पातळीवर यशस्वी ठरले आहेत.          सन टीव्ही नेटवर्कचा डिजिटल क्षेत्रात SUNNxt  हा ब्रँड असून त्यावर तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम ह्या चार दक्षिण भारतीय भाषांमध्ये ५०,००० तासांहून अधिक टीव्हीवरील कार्यक्रम, चित्रपट, संगीत, लहान मुलांसाठी असे वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजन उपलब्ध आहे.         SUNrisers हैदराबाद हि IPL टीम सुद्धा  सन टीव्ही नेटवर्क ह्या समूहाच्या मालकीची असून ह्या टीमने २०१६ साली IPL स्पर्धा जिंकली होती तसेच २०१८ साली हि टीम IPL मध्ये उपविजेती ठरली होती.  

Post a Comment

0 Comments