प्रियांका गांधींमध्ये इंदिरा गांधींचे रूप – शीफा मेशहर


■कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागातर्फे इंदिरा गांधी यांना आदरांजली....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  लखीमपूर येथील घटनेनंतर कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी ज्या प्रकारे तिथली परिस्थिती हाताळत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या यामुळे प्रियांका गांधी यांच्यामध्ये इंदिरा गांधी यांचे रूप दिसत असल्याची भावना कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षा शीफा मेशहर यांनी व्यक्त केली. कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 


          यावेळी इंदिरा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पुष्प अर्पण करत आदराजंली वाहण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष केणेअल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सलीम शेखडोंबिवली ब्लॉक अध्यक्ष एकनाथ म्हात्रेडोंबिवली पूर्व उपाध्यक्ष प्रणव केणे,शरद भोईरशमशेर खान आदी मान्यवर उपस्थित होते.


३१ ऑक्टोबर १९८४ साली इंदिरा गांधी यांची हत्या झाली. आयरन लेडी म्हटल्या जाणाऱ्या भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज ३७ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने त्यांना आदरांजली अर्पण केली. लखीमपुर येथे शेतकऱ्यांना अत्यंत क्रूरपणे गाडीखाली चिरडल्यानंतर कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी त्याठिकाणी जात ज्याप्रकारे शेतकऱ्यांची मदत केलीत्यांची बाजू लावून धरत अन्याया विरुद्ध आवाज उठवला यामुळे इंदिरा गांधी यांचं रूप त्यांच्यात पाहायला मिळालं असून इंदिरा गांधी या अमर असल्याचं प्रियांका गांधी यांच्यामुळे दिसून आलं असल्याचे शीफा मेशहर यांनी सांगितले.


भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. त्यांच्यानंतर तिसऱ्या पंतप्रधान या इंदिरा गांधी या झाल्या. सर्वात जास्त पंतप्रधान पदाचा कार्यकाळ भूषवणाऱ्या पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख आहे. गोर गरिबांसाठी चांगलं काम करत भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम देखील इंदिरा गांधी यांनी केलं. तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोंबर १८७५ ला नदीयाल येथे झाला. त्यांची १४६ वी जयंती आज साजरी केली जात असून राष्ट्रीय एकतेचे ते प्रतिक असल्याचे मत देखील शीफा मेशहर यांनी व्यक्त केले.


           झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी जमादारफिरोज सय्यदअशफाक शेखनर्गिस खानखैरुन्बीरुबिना शेखफरजाना शेखतबस्सुम शेखतबस्सुम चौधरीसंगीता धोंगाडेश्रद्धारंजना आदींसह इतर कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments