महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख
भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानगरपालिकेचा वैद्यकीय आरोग्य विभाग देखील सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहे.पण तरीही महाविद्यालयीन स्तरावर 18 वर्षांवरील विद्यार्थी वर्ग लसीकरण करताना दिसत नाही, ही बाब चिंताजनक आहे. वास्तविक येत्या 20 ऑक्टोबर असून पालिका क्षेत्रातील सर्व 13 वीच्या पुढील वर्ग महाविद्यालय कोरोनचे सर्व निकष पाळून सुरू करण्यात आलेली आहेत.            महाविद्यालय वर्ग सुरू करताना लसीकरण हा भाग अत्यावश्यक केलेला आहे, ही बाब विसरून चालणार नाही. जर आपल्याला महाविद्यालय व्यवस्थित रीत्या सुरु ठेवायची असतील तर 100  टक्के लसीकरण करणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी लस  घेणार नाहीत, त्यांना वारंवार सूचना करा त्यांना लस घेण्यास प्रवृत्त करा शेवटी नाइलाजाने लस  घेण्यास टाळाटाळ करतील त्या विद्यार्थ्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करा, नाहीतर संबधित  त्या महाविद्यालयाच्या विरोधात नियमानुसार साथ रोग प्रतिबंधक कायदा अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिला.            राज्यातील सर्व महाविद्यालय सुरू करणे बाबत राज्य शासनाने निर्देश दिले आहे हे महाविद्यालय सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व व्यवस्थापन प्रमुख यांची बैठक आज महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सदरचा इशारा शहरातील सर्व महाविद्यालयीन व्यवस्थापन , संबंधित प्राचार्य यांना दिला .            यावेळी वैद्यकीय आरोग्य आरोग्य अधिकारी कारभारी खरात, जागतिक आरोग्य संघटना, भिवंडी समन्वयक डॉ.किशोर चव्हाण, आर. सी.एच.अधिकारी वर्षा बारोड , माध्यमिक शिक्षण विभाग प्रमुख सौदागर शिखरे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, शहरातील सर्व महाविद्यालयीन प्राचार्य त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.         राज्य शासनाच्या आदेशाने सर्व महाविद्यालय सुरू करताना दिनांक 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर पर्यंत *मिशन युवा स्वास्थ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने *मिशन युवा स्वास्थ* अंतर्गत सर्व 18 वर्षांवरील विद्यार्थी वर्गाचे लसीकरण करणे आवश्यक आहे.        याकामी महाविद्यालयात लसीकरण कार्यक्रम आयोजित करावेत. जर सर्व महाविद्यालये पूर्ण क्षमतेने चालवायची असतील तर विद्यार्थी वर्गाचे आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे व त्या करिता लसीकरण , कोविड बाबतचे सर्व नियमांचे अनुपालन करणे आवश्यक आहे. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी 

 

    

           महाविद्यालय एन सी सी, एन एस एस च्या विद्यार्थ्यांची तसेच वर्ग प्रतिनिधी यांची देखील  मदत घ्यावी. त्यांचा वापर डेटा एन्ट्री करता कर्मचारी वर्ग , संगणक कक्ष उपलद्भ करून द्यावेत. कोविडची जबाबदारी सर्वाची सर्व शासिकिय, निमशासकीय कार्यालये, खाजगी संस्था या सर्वांची आहे. सर्व महाविद्यालय प्राचार्य व व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करावे.          तसेच लसीकरण कामात महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन देखील पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे. जी महाविद्यालये  लसीकरणाची उद्दिष्ट्ये साध्य करतील त्यांचा पालिकेच्या वतीने विशेष गौरव करण्यात येईल पण जी महाविद्यालये लसीकरण कामात टाळाटाळ करतील त्यांच्या विरोधात नियमानुसार कारवाई करण्यात येईल याची देखील नोंद घ्यावी, असा इशारा पालिका आयुक्त यांनी दिला.

Post a Comment

0 Comments