स्व. सलाबत उस्मान तडवी गुरूजी यांचा ४था स्मृतिदिन व शिक्षक गौरव सोहळा संपन्न
कल्याण, कुणाल  म्हात्रे  : कल्याण येथील यशोदा हॉल या ठिकाणी निंबायती, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद येथील स्व. सलाबत  उस्मान तडवी गुरूजी यांचा ४ था स्मृतिदिन तडवी कुटुंबियांच्या  वतीने साजरा करण्यात  आला. यावेळी अध्यक्ष स्थानी कल्याण  भारत  स्काऊट  गाईड स्थानिक संस्थेचे अध्यक्ष तथा समाजवर्ती व्यक्तीमत्व डॉ. विजय पंडित उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विद्याभूषण हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज दहीसरचे प्राचार्य तथा स्व.तडवी गुरूजी यांचे शिष्य  प्रा. संजय पाटील हे होते.यावेळी तडवी परिवारातील दिलीप तडवी, गुरूजींच्या स्नुषा समिना तडवी व नात डॉ. श्वेतलाना तडवी उपस्थित होते. प्रास्ताविक करताना दिलीप तडवी यांनी वडिलांनी केलेल्या संस्कारामुळे मी आज शिक्षक आहे. तसेच त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला तडवी कुटुंबियांच्या वतीने अतिथींचे शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन  स्वागत  करण्यात  आले. गुरुजींचे शिष्य प्रा. संजय पाटील यांनी गतस्मृतीला उजाळा देताना त्यांच्या आशीर्वादामुळेच गेली २७ वर्षे मुख्याध्यापक पदावर आहे हे नमूद केले. तसेच वेळेचे पालन आणि शिस्त या दोन बाबी त्यांच्यामुळेच  शिकलो हे आवर्जून सांगितले. शिक्षकांनी प्रामाणिक पणे ज्ञानदान करावे अशी सूचना केली.त्यानंतर  उपस्थित  गुरूजनांचा आदर्श  शिक्षक-२०२१ म्हणून  गौरव करण्यात  आला. अतिथींच्या शुभहस्ते मानपत्र, स्मृतिचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सन्मानित केले. अध्यक्षीय मनोगतात विजय पंडित  यांनी समाजातील शिक्षकांचे आणि जीवनातील आईवडिलांचे महत्त्व पटवून दिले. तसेच तडवी कुटुंबियांचे कौतुक  केले. यावेळी रंजना बावस्कर, बाळासाहेब भोसले, निवेदिता कोरान्ने, शशिकांत पाटीलसुधाकर ठोके, दशरथ आगवणे, अपर्णा हर्षे, निता जाधव, विजेता रहाटे, सुभाष सरोदे, अशोक नाईकगणेश पाटीलआबा पवार, सुभाष  गायकवाड, मजिदुल्ला  ईनामदार, कैलास  सरोदे, संजय मुसळे, रमाकांत सोनावणे या गुरुजनांना सन्मानित करण्यात आले.स्मृतीदिनाच्या निमित्ताने कैलास सरोदेआबा पवार, गणेश पाटीलरमाकांत सोनवणे यांनी आपल्या भावना व्यक्त  केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण खाडे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार दिलीप तडवी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments