लसीकरण प्रक्रिये विरोधात काॅग्रेसचे धरणे आंदोलन
ठाणे , प्रतिनिधी  :  दोन दिवसांपूर्वीच ठाणे महापालिकेत महापौर दालनात झालेल्या बाचाबाची नंतर काँग्रेसने ठाणे महापालिकेची लसीकरण प्रकिया राजकारण होत असल्याचा आरोप करित ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर धरणे आंदोलन केले.


            दोन दिवसांपूर्वीच शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या मध्ये महापौर दालनात आरोप-प्रत्यारोप होऊन बाचाबाची झाली होती,आज ठाणे शहर काॅग्रेसने देखील  कोरोना लसीकरण प्रकीयेत राजकारण होत असल्याचा आरोप करित महापालिकेच्या मुख्यालयासमोर शहराध्यक्ष अँड.विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले.             याप्रसंगी शहर काॅग्रेस सरचिटणीस सचिन शिंदे,प्रदेश सदस्य सुखदेव घोलप,शैलेश शिंदे,महेंद्र म्हात्रे,भालचंद्र महाडिक,प्रवक्ते रमेश इंदिसे,युवक अध्यक्ष आशिष गिरी,रूशिकेश तायडे,गजेंद्र तोमर,नाना कदम,राहुल पिंगळे,प्रसाद पाटील,हिन्दुराव गळवे,पप्पू सिंग,शितल आहेर,अॅड. दरम्यान सिंग,दयानंद ऐगडे,जावेद शेख,मिनाक्षी थोरात,रिना गजरा,हेमांगी चोरगे,स्वप्नील कोळी,निलेश अहिरे,डाॅ.जयेश परमार,गिरीश कोळी,संजय दंडाले,संजय घाग,संतोष जोशी,गोपाल सांवत,जानबा पाटील,अरूण राजगुर,मनोज पांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.                या वेळी बोलताना अॅड.विक्रांत चव्हाण यांनी सागितले की,ठाणे महानगर पालिकेत गेली अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता असून केवळ जनतेला सरकार करून आलेली लस फक्त आम्हीच सर्व जनतेचे लसीकरण करतो असे भासवून जनतेची फसवणूक करण्याचा प्रयत्न होत आहे येत्या काही महिन्यांतच निवडणूका येत असल्याने या लसीकरणात राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप करित त्यांनी हे राजकारण असेच चालू राहिले तर आम्ही महापालिका आयुक्तांच्या बंगल्याबाहेर आदोलन करू असा इशारा त्यांनी शेवटी दिला. ठाणे महापालिकेचे उपायुक्त मनिष जोशी यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले.

Post a Comment

0 Comments