राज्यपालांच्या हस्ते संजय मोरे यांना कोरोना योद्धा लोकसेवा गौरव पुरस्कार प्रदान
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत भाजपा कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष तथा परिवहन सदस्य संजय मोरे यांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते कोरोना योद्धा लोकसेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.युनायटेड बुद्धिस्ट आणि आंबेडकर राईट फाऊंडेशनेच्या वतीने राजभवन येथे लोकसेवा गौरवपुरस्कार  सोहळा पार पडला. यावेळी महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कोरोना काळात तसेच अन्य सामजिक कार्याचा आढावा घेऊन, केलेल्या कार्याची दखल घेत संजय मोरे यांना सन्मानीत करण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार गणपत गायकवाड हे देखील उपस्थितीत होते.या पुरस्काराने नव उत्साह निर्माण झाला असून  या पुरस्काराचा नम्रपणे स्विकार करुन हा पुरस्कार कोरोना विरुध्द लढणाऱ्याजीवाची पर्वा न करता जनतेचे आरोग्य सुरक्षीत रहावे यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या सर्व कोरोना योध्दयांना अर्पण करीत असल्याची प्रतिकिया संजय मोरे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments