दोन वर्षाच्या चिमुकलीने केले सह्याद्री पर्वत रांगेतील किल्ले सर

 

■चिमुकल्या प्रचिती घरतची अलंग, मदन आणि कुलंग किल्ल्यावर चढाई...


कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  दोन वर्षाच्या चिमुकलीने सह्याद्री पर्वत रांगेतील किल्ले सर केले असून चिमुकल्या प्रचिती घरतने अलंग, मदन आणि कुलंग या कठीण किल्ल्यांवर चढाई केली आहे.          अलंग, मदन आणि कुलंग म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत सुमारे ४५०० हजार फूट पेक्षाही अधिक उंचीवर वसलेले हे तीन किल्ले आहेत. इगतपुरीच्या आंबेवाडी या पायथ्याशी असलेल्या गावापासून गड सर करण्यासाठी सुरुवात होते. भल्याभल्या मोठ्यांच्या शौर्याची परीक्षा घेणारे हे तीन किल्ले मात्र वय वर्ष दोन असणाऱ्या प्रचिती घरत ह्या चिमुरडीने ने "सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर" ह्या समूहाच्या मदतीने मात्र सहज सर केले. दोन दिवसांच्या ह्या मोहिमेत प्रचितीने क्लाइंबिंग आणि राप्पेल्लिंग सारख्या अवघड आणि मोठमोठ्यांना सुद्धा थरारून सोडणाऱ्या गोष्टी सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्यांच्या मार्फत आरामात करून घेतल्या.     आंबेवाडी पासून सुमारे दोन तासांची पायपीट आणि चढण करून गडाच्या पायथ्याशी पोहचता येते. तिथून चालू होतो गड सर करण्याचा खरा थरार. अलंग,मदन आणि कुलंग मोहीम यशस्वी करून दाखवताच प्रचितीने ही मोहीम पूर्ण करणारी सर्वात लहान गिर्यारोहक बनण्याचा मान पटकावला. ह्या आधीही सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरची मोहीम पार पाडली होती. या मोहिमेत सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरचे पवन घुगे, दर्शन देशमुखरणजित देशमुख, भूषण पवार आणि अक्षय जमदारे सहभागी झाले होते. प्रचीतीला प्रत्येक मोहिमेत सहकार्य करणार असे यावेळी सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरच्या वतीने सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments