कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयात विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : तब्बल दीड वर्षानंतर कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सोमवार पासून सुरू झाल्या  असून कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयातही शाळेची घंटा वाजल्यानंतर विद्यार्थ्याचे शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ शाळा व्यवस्थापनाच्या विद्यमाने या शाळेच्या शिक्षकांनी ढोल ताशांच्या गजरात  विद्यार्थ्यांवर पुष्प उधळून व औक्षण करून जंगी स्वागत केले. इयत्ता आठवी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी फक्त घड्याळी तीन तासाचे  वर्ग भरविले जाणार असून विद्यार्थ्यांचे काही दिवस समोपदेशन केले जाणार असल्याचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी सांगितले. 
            शासन परिपत्रकाप्रमाणे  सर्व अटी शर्तीचे पालन करण्यात येईल असे संस्थेचे अध्यक्ष पी. टी. धनविजय म्हणाले. विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर आल्यावर काही विद्यार्थी भावूक होऊन त्यांचे डोळे आनंद अश्रूने ओले झाल्याचे दिसून आले. तर डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी विभागातील मातोश्री सरलाबाई म्हात्रे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे व  शिक्षक वर्गाचे व कर्मचारी यांचे मनःपूर्वक स्वागत केले.

Post a Comment

0 Comments