युवक काँग्रेसच्या निवडणुकीचे बिगुल वाजले जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घेण्याचे निवडणूक प्रभारी मुकुल गुप्ता यांचे आवाहन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवलीसह  संपूर्ण राज्यात युवक काँग्रेसच्या  अंतर्गत निवडणुकांची घोषणा निवडणूक प्रभारी मुकुल गुप्ता यांनी कल्याण मध्ये शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. या निवडणुका अध्यक्षपदासह इतर सर्वच पदांसाठी होणार आहेत. 

          

            २७ ऑक्टोबरपासून सदस्य अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून युवकांना राजकारणात संधी देणार  असल्याची माहिती युवक काँग्रेसतर्फे देण्यात आली. यावेळी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनिष देसले, फिरोज शेख, सुशील सैनी, पमेश म्हात्रे, कपिल सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.


युवक काँग्रेसतर्फे लढवण्यात येणाऱ्या अंतर्गत निवडणुकांसंबंधी बिगुल वाजले आहे. १२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या निवडणुकांसाठी तरुण कार्यकर्त्यांनी पुढे येण्याचे आवाहन युवक काँग्रेसमार्फत केले आहे. खासदार राहुल गांधी यांच्या लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन सर्वसामान्य घरातील युवकांना संधी देण्यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. 


निवडणूक लढवायची आहे अशांनी उमेदवारी अर्ज भरून सहभाग नोंदवावा. उमेदवारीबाबत हरकत आल्यास ७ नोव्हेंबरपासून १२ नोव्हेंबरपर्यंत हरकत नोंदवू शकताअसे मुकुल गुप्ता यांनी स्पष्ट केले. 

Post a Comment

0 Comments