आंबिवलीतील केडीएमसीच्या वनराईत फुलपाखरांचा मुक्त संचार गर्द वनराईमुळे जैवविविधता वाढली

कल्याण , प्रतिनिधी   : आंबिवली येथील बल्याणी टेकडी परिसरात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सुमारे १५ हजारहुन अधिक झाडे लावुन जोपसना केल्याने वनराई बहरली असुन जैवविविधता वाढत असल्याचे चित्र रंगीबेरंगी फुलपाखरांच्या वाढत्या मुक्त संचारामुळे दिसत आहे.       आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हरित पट्टयाच्या सर्वधनसाठी शहर अभियंता सपना कोळीमुख्‍य उदयान अधिक्षक संजय जाधव आणि प्रभारी उद्यान अधिक्षक अनिल तामोरे आणि कर्मचारी वर्गाच्या  यशस्वी नियोजनामुळे आंबिवली येथील वनराई मुळे हरित पट्टा संरक्षित झाला असून वनक्षेत्र पट्टा अबाधित राहत संभाव्य अनाधिकृत बांधकाम अतिक्रमणे याला यामुळे चाप बसला आहे. या  जैवविविधता वाढुन नैसर्गिक समतोल साधण्यास मदत होत आहे. आंबिवली परिसरात वाढणा-या गर्द वनराईमध्‍ये आढळणारे रानफुलाचे ताटवेपक्षीरंगीबेरंगी फुलपाखरे पाहता आगमी काळात हे ठिकाण नैसर्गिक वातारणातील सर्वसामान्यासांठी विरगुंळा केंन्द्र तसेच पक्षी निरिक्षण करणाऱ्या साठी पक्षी  अ‍भयारण्‍य केंन्द्र बनलेय यात तीळ मात्र शंका नाही. मात्र काही समाज कंटकाकडून या उद्यानातील प्राण्यांना हानी पोहचवली जात असल्यामुळे वनविभागाने या उद्यानात गस्त सुरु केली असून निसर्गप्रेमीनी या संपदेची हानी करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वनराईमुळे जैवविविधता वाढत असल्याने नैसर्गिक समतोल साधण्यास मदत होत आहे. रंगीबेरंगी फुलपाखरेरानफुलाचे ताटव्यामुळे परिसर निसर्ग रम्य होत आहे. प्रशासनाकडून या नेचर ट्रॅकची माहिती देण्यासाठी  १५ तरुणांना नेचर ट्रेकिंगचे प्रशिक्षण दिले जाणार असून हे तरूण या उद्यानात गाईड म्हणून काम करणार असल्याची माहितीशहर अभियंता सपना कोळी यांनी दिली.        याबाबत मनपा सचिवमुख्‍य उदयान अधिक्षक संजय जाधव यांच्याशी संपर्क साधला असता मनपा क्षेत्रातील हरित पट्टा संवर्धन व शहरीभागात असणाऱ्या काँक्रीटच्या जंगलात हिरवाईचे जतन नैसर्गिक समतोल साधण्याबाबत मनपाचे प्रयत्न सुरू राहणार आहेत. या वनराईमध्ये २२ प्रकारचे पक्षी, ६ सरपटणारे प्राणी, ३९ रान फुलांच्या जाती, १३  किड्यांच्या  प्रजाती, १ उभयचर आणि २ सस्तन प्राणी आढळले असल्याचे त्यांनी सांगितले.       तर वाढत्या शहरीकरणाचा वेग पाहता हरित पट्ट्यांचे जतन आणि संवर्धन हि काळाची गरज आहे. प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हरितपट्ट्यामध्ये वनराई जोपासून वनराई कशी बहरेल असा मनपा प्रशासनाचा मानस असल्याचे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments