महिला बचत गटांच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी केडीएमसीची स्टाँल सुविधा

                               कल्याण , प्रतिनिधी  :  कल्याण डोंबिवली मनपा मनपा क्षेत्रातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठत विक्रीसाठी स्टाँल तात्पुरते उपलब्ध करणार असल्याने कोरोना सकंटामुळे डबघाईला आलेल्या बचत गटांना उत्पन्नाचा स्त्रोत्र प्राप्त होणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षोचे औचित्य साधत माहिला बचत गटाच्या रॅलीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण योजनांबाबत जनजागृती मोहीम मनपाक्षेत्रात सुरू केली आहे.        कल्याण डोंबिवली मनपाच्या अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील सुमारे ७९७ महिला बचतगट, खुले ७५० महिला बचतगट असे एकंदरीत १५४७ महिला बचत गट नोंदणीकूत्त असुन या महिला बचत गटांतील अनेक महिला बचतगट महिला  सक्षमीकरणासाठी महनेत  घेत आपली उत्पादने उ्त्पादित करून  उत्पादित मालांची विक्री करीत समक्षीकरणाकडे वाटचाल सुरू होती.          गेली  दीड वर्षी पासून कोरोना पार्श्वभुमीवर लाँकडाऊनचा फटका बसल्याने  महिला बचत  गटांच्या उत्पादांना विक्रि अभावी घरघर लागली होती. कल्याण डोंबिवली मनपाने २३ ते २७ आँक्टोबर या कालावधीत  महिला बचत गटांच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी मनपा मुख्यालय लगत सुमारे २०स्टाँल मफाक दरात उपलब्ध होणार असल्याची माहिती समाज कल्याण अधिकारी प्रशांत गवाणकर यांनी दिली.       

     


        उप आयुक्त अनंत कदम यांच्याशी संपर्क साधला असता मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचत गटांच्या उत्पादित मालाला हक्काची बाजारपेठ मिळण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असुन महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल होण्यासाठी दिवाळी दरम्यान जागेच्या उपलब्ध ते नुसारमनपाच्या विविध प्रभागक्षेत्र कार्यालया नजीक तात्पुरते स्वरूपाचे स्टाँल उपलब्ध करण्याचा मानस असुन आगामी पे अँन्ड पार्किंगच्या निवादा प्रक्रियेत महिला बचत गटांना प्राध्यन देणार असल्याचे सांगितले."        

Post a Comment

0 Comments