आंबिवली येथील पेपर मिल ला टाकाऊ पदार्थ न टाकण्याचे आदेश


■माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या तक्रारी नंतर महानगर पालिकेचे कंपनीला आदेश..


कल्याण, कुणाल  म्हात्रे  : आंबिवली येथील बालकृष्णा पेपर मिलला टाकाऊ पदार्थ नाल्यात न सोडण्याचे आदेश महापालिकेने दिल्याने भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी याबाबत केलेल्या तक्रारीनंतर कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने तातडीने कार्यवाही केली आहे.आंबिवली येथील बाळकृष्ण पेपर मिल मधील टाकाऊ पदार्थ हरिश्चंद्र पाटील यांचे शेत जमिनीत टाकल्यामुळे त्यांच्या भातशेतीचे नुकसान होत होते.  त्याबाबतची तक्रार पाटील यांनी केली होती. कंपनीच्या भोवती संरक्षण भिंत नसल्याने कंपनीचा टाकाऊ पदार्थ इतस्थतः पसरल्याने भातशेतीनाला व  काळु नदी प्रदूषित होत असल्याचे निदर्शनास येत होते.  टाकाऊ पदार्थामुळे नैसर्गिक नाल्याची रूंदी कमी होऊन पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न झाल्याने तक्रारदार यांच्या भातशेतीचे नुकसान होत होते.याविषयी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पालिकेच्या पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे तक्रार देऊन तातडीने याबाबत कार्यवाही करण्याची मागणी करून पाठपुरावा केला. नरेंद्र पवार यांच्या तक्रारीवरून तातडीने महापालिकेने संबंधित कंपनीला टाकाऊ पदार्थ पसरवण्याचे काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत.

Post a Comment

0 Comments