अंबरनाथकरता १० एमएलडी वाढीव पाणीपुरवठा करा

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची एमआयडीसी अधिकाऱ्यांना सूचना

 अंबरनाथ : शहरातील पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकी दरम्यान अंबरनाथ शहरातील वाढत्या पाणीटंचाई संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी अंबरनाथकरता वाढीव १० एमएलडी पाणीपुरवठा करण्याच्या सूचना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना दिल्या.

        अंबरनाथची सन २०४८ ची लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात शहराला पाणीटंचाई उदभवू नये याकरता नियोजन करण्याच्या दृष्टीने पाणी साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा, एमआयडीसी आणि पाणीपुरवठा विभागासोबत संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी अशी मागणी आमदार डॉ. किणीकर यांनी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत ही बैठक घेण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच मजीप्राच्या ग्राहकांकरता आठवढाभरात अभय योजना लागू करण्यात येणार असल्याचे ही पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी सांगितले आहे.
याबैठकीला पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जैस्वाल, अंबरनाथ नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख, माजी नगरसेवक सुभाष साळुंखे, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, मजीप्रा अधिक्षक अभियंता निरभवणे, एम.आय.डी. सी.अधीक्षक अभियंता नागे, मजीप्रा कार्यकारी अभियंता बसनगार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता महाजन तसेच जलसंपदा, एमआयडीसी आणि पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अंबरनाथ, राजकीय, आश्चर्यकारक


Post a Comment

0 Comments