जेष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जेष्ठ नागरिक स्वातंत्र्य विभाग मंत्रालय सुरु करा

  

■भाजपाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अॅड. डॉ. राजू राम यांची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी...


कल्याण, कुणाल  म्हात्रे  : सध्याच्या धावापळीच्या आणि महामारीच्या काळात वृद्धांच्या समस्या पाहता जेष्ठ सामाजिक कार्यकर्तेभाजपा प्रदेश पदाधिकारी अॅड. डॉ. राजू राम व जिल्हा संयोजिका अॅड शिल्पा राम यांनी वृद्धांच्या समस्या सोडिविण्यासाठी महिलाबालके तसेच युथ यांच्या विभाग मंत्रालया प्रमाणेच वृद्धांच्याजेष्ठ नागरिकांच्या समस्या सोडिविण्यासाठीत्यांना न्याय हक्क देण्यासाठी स्वातंत्र्य जेष्ठ नागरिक विभाग मंत्रालय सुरु करावे अशी मागणी जेष्ठ नागरिक दिनानिमित्त राज्य व केंद्र सरकारकडे भाजपच्या वतीने केली आहे.जेष्ठ नागरिक हा समाजाचा अत्यंत महत्वाचा अंग असून त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही जरूर करू. तसेच जेष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार जो पर्यंत सुरु करत नाही तो पर्यंत पाठपुरावा करतच राहू असे प्रतिवादन डॉ. राजू राम यांनी यावेळी केले. तसेच जेष्ठ नागरिकांना कोणत्याही समस्या असल्यास त्यांनी कल्याण येथील खडकपाडा भाजपा कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा ८५९१२२११२१ या नंबरवर संपर्क करावा असे आव्हान अॅड. डॉ. राजू राम यांनी यावेळी केले आहे. 

Post a Comment

0 Comments