वृत्तपत्र वाचून विद्यार्थ्यांनी साजरा केला वाचन प्रेरणा दिन सम्राट अशोक शाळेतील उपक्रम
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : केंद्र सरकारच्या आदेशान्वये भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी वाचन प्रेरणा दिन शाळांमध्ये साजरा केला जातो. या वर्षी पंधरा ऑक्टोबरला दसरा आल्याने शाळांना सुट्टी होती. सम्राट अशोक शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्या कल्पनेतून विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसमवेत घरीच वाचन प्रेरणा दिन साजरा केला. विद्यार्थ्यांना आदल्या दिवशी शिक्षकांनी सूचना दिल्याप्रमाणे वेगवेगळे वृत्तपत्र विकत घेऊन आपल्या आई-बाबांसोबत वृत्तपत्र वाचन केले. वृत्तपत्र लोकशाहीचा चौथा स्तंभ याच्यावर निबंध स्पर्धा आयोजीत केल्याने काही विद्यार्थ्यानी निबंध लिहिले. वृत्तपत्र वाचक दिवसेंदिवस कमी होत आहेत. तसं पाहिलं तर वृत्तपत्र माध्यमातून सर्व प्रकारची माहिती मिळत असते. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पेपर विकत आणला व आपल्या पालकांबरोबर पेपर वाचला. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये वाचण्याची आवड निर्माण होईल असे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी सांगितले. या उपक्रमात शाळेतील शिक्षक गणेश पाटील यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments