लघु उद्योगां करीता ट्रेड इंडियाचा ‘मुनाफा महोत्सव २०२१’ सेल कमी किमतीची हमी देणारा सर्वात मोठा बी२बी सेल ~
मुंबई, १४ ऑक्टोबर २०२१  :  ट्रेडइंडियाद्वारे लॉन्च करण्यात आलेल्या ट्रेडइंडिया शॉपिंग या ई-कॉमर्स व्यासपीठाच्या माध्यमातून एसएमई व एमएसएमई आपल्या खरेदीच्या गरजा सहजपणे भागवू शकतील. ट्रेडइंडिया शॉपिंग आपल्या पहिल्यावाहिल्या आणि ‘बहुप्रतीक्षित मुनाफा महोत्सव २०२१’ साठी सज्ज झाले आहे.        या भव्य सेल सोहळ्यात ट्रेडइंडिया किराणा दुकानमालक, किरकोळ विक्रेते, लघु व मध्यम उद्योग (एसएमई) आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचा दृष्टीकोन बदलण्याचा मानस व्यक्त करत आहे. तसेच अत्यंत किफायतशीर दरांत आपल्या दुकानांसाठीचा माल ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी त्यांना प्रोत्साहनही देत आहे.         दिवाळीत भेटवस्तू देण्यासाठी लघुद्योजकांना घाऊकपणे उत्तम मार्जिन दरांत दिवाळी भेटीही (गिफ्ट हॅम्पर्स) विकत घेता येतील. मुनाफा महोत्सवाच्या माध्यमातून त्यांना कमी किमतींत आकर्षक दिवाळी गिफ्ट हॅम्पर्सच्या विस्तृत श्रृंखलेचा शोध घेण्यातही मदत होणार आहे. याशिवाय, या अत्यंत कमी दरांतील सेलच्या माध्यमातून ट्रेडइंडियाचा बी२बी व्यापार क्षेत्रात दिमाखदार प्रवेशही होत आहे. हा सेल १७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुरु राहील.        सर्वात कमी दरांत टॉप ब्रँड्सच्या एकमेव खरेदी स्थळाच्या रूपात ट्रेडइंडिया शॉपिंग्ज प्लॅटफॉर्म ग्राहकांना आपला व्यवसाय सुलभपणे चालवण्यासाठी आणि अत्यावश्यक वस्तूंच्या अखंडित पुरवठ्यासाठी मोठा लाभदायक ठरणार आहे. यामुळे एमएसएमई व एसएमईंना घसघशीत नफ्यासह त्यांच्या विक्रीतही भरघोस वाढ होण्यात मदत मिळेल.           ट्रेडइंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री संदीप छेत्री म्हणाले की, “एमएसएमई आणि एमएसईंच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाप्रति आमच्या बांधिलकीला सीमा नाहीत. अगदी महामारीच्या प्रारंभापासून आम्ही देशभरातील छोटे व्यावसायिक आणि किराणा दुकानदारांना डिजिटल व्यवहारांकडे वळवण्याच्या मोहिमेत प्रयत्नरत आहोत. अनेक व्यापारिक कार्यक्रम आणि एक्स्पोचे यशस्वी आयोजन केल्यानंतर आता आम्ही ट्रेडइंडियाच्या पहिल्यावाहिल्या ‘मुनाफा महोत्सव’ या मेगासेलच्या आयोजनाकडे लक्ष केंद्रित केले आहे.         उदयोन्मुख भारताच्या लघु, किरकोळ विक्रेते आणि दुकानदारांना ई-कॉमर्सचा लाभ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आम्ही चांगलीच कंबर कसली असून विविध सर्वोत्तम व उभरत्या ब्रँड्ससोबत हातमिळवणी करण्यात आली आहे. याद्वारे आमच्या लक्षावधी ग्राहकांना पारदर्शी मूल्यनिर्धारण, उत्तम निवड आकर्षक दरांत वैविध्यपूर्ण उत्पादनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. या सणासुदीत आकर्षक डील्स आणि हमखास ऑफर्सद्वारे देशातील किराणा दुकानांना मोठा फायदा होईल, याची आम्हाला खात्री आहे.”

Post a Comment

0 Comments