आरटिओ, वाहतुक पोलिस, महापालिका अधिकारी यांच्याकडून रिक्षा स्टॅण्डचे सर्वेक्षण


■सर्वेक्षणात रिक्षा चालक मालक असोसिएशनचे पदाधिकारी सहभागी....कल्याण  , कुणाल  म्हात्रे   : आरटिओवाहतुक पोलिसमहापालिका आधिकारी यांच्याकडून कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील  रिक्षा स्टॅण्डचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात रिक्षा चालक मालक असोसिएशनचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. सॅटीसचे काम पुर्ण होईपंर्यतं रेल्वे हद्दीतील बंद केलेले रिक्षा स्टँण्ड सुरु ठेवा आणि  भविष्यात रेल्वे हद्दीत व महापालिका हद्दीत प्रशस्त रिक्षा स्टॅण्ड निर्माण करण्याची मागणी यावेळी रिक्षा चालकांकडून करण्यात आली.महापालिका मुख्यलयात मध्यंतरी महापालिका क्षेञात वाहतुक व्यवस्था नियोजन उपाययोजना याकरीता आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी आरटीओ, वाहतुक पोलिस, महापालिका आधिकारी यांच्या संपन्न झालेल्या बैठकीत आरटिओ, वाहतुक पोलिस रिक्षा संघटना प्रतिनिधी यांचा सहभाग असलेल्या समिती मार्फत महापालिका क्षेञातील रिक्षा स्टॅण्ड सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कल्याण स्टेशन पश्चिम येथुन साहाय्यक उपप्रादेशिक परिवहन आधिकारी विनोद साळवी, मोटार वाहन तपासणिस राहुल पवार, वरिष्ठ लिपिक रविद्रं कुलकर्णी तसेच शहर वाहतुक विभाग साहाय्यक पोलिस निरीक्षक संकुडे यांनी रिक्षा टॅक्सी संघटना प्रतिनिधी समवेत रिक्षा स्टॅण्ड  सर्वेक्षण केले. रिक्षा चालक मालक असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्या समवेत रिक्षाचालकांचे दिवंगत नेते प्रकाश पेणकर यांचे पुञ प्रणव व प्रतिक पेणकर आवर्जुन उपस्थित होते.रिक्षा स्टॅण्ड सर्वेक्षण करताना गेली चाळीस वर्ष आस्तीवात असलेले रेल्वे हद्दीतील रिक्षा स्टॅण्ड कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महापालिका हद्दीत रेल्वे स्टेशन परिसरात शहर आरखाड्यानुसार  आजगायत प्रशस्त रिक्षा स्टँण्ड नाही. स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत सॅटीस काम सुरु आहे. सुरळित सुरक्षित वाहतुक व प्रवाशी रिक्षा प्रवास सोयीसुविधा याकरीता योग्य नियोजन करावे. सॅटीस काम पुर्ण होईपंर्यत रेल्वे हद्दीतील बंद केलेले रिक्षा स्टॅण्ड सुरु ठेवावा. भविष्यात स्मार्ट सिटीरेल्वे, महापालिका, आरटीओ, वाहतुक पोलिस आधिकारी यांच्यात समनव्यय साधुन स्टेशन परिसरात रेल्वे हद्दीत व महापालिका हद्दीत प्रशस्त नियोजनबध्द रिक्षा स्टॅण्ड नवनिर्माण करावे.  लवकरच सर्व विभागांची संयुक्तिक बैठक आयोजन करुन रिक्षा स्टॅण्ड संदर्भात योग्य निर्णय घेतले जातील असे परिवहन आधिकारी यांनी सांगितले .कल्याण पुर्व पश्चिम येथे जुन्या स्टॅण्ड व्यतिरीक्त शहरीकरण झालेल्या नवीन ठिकाणी रिक्षा स्टँण्डंची संख्या वाढवुन तशी सुची रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी परिवहन आधिकारी यांना सादर केली. रिक्षा स्टॅण्ड सर्वेक्षणवेळी विलास वैद्यजितु पवारसंतोष नवले, काका मढवीशगीर शेख, आबा भसमारे,  वंसत पाटीलबंडु वाडेकर, प्रताप सरोदेहेमंत सांगळे आदी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments