विनोद भोईर यांना राज्यपालांच्या हस्ते डॉ. ए पी जे अब्दुल कलाम पुरस्कार प्रदान




कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याणमधील समाजसेवक तथा उद्योजक विनोद भोईर यांना उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ ए पी जे अब्दुल कलाम पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथील राजभवनात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते रियल इस्टेट विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करून सन्मानित करण्यात आले.  त्यांच्या या कामगिरीबद्दल कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.



       रिअल इस्टेट क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जोपासून विनोद भोईर यांनी अनेकांच्या संकटकाळात धावून त्यांना मदतीचा हात दिला आहे. आपले स्वतःचे घर असावे अशी प्रत्येक सर्वसामान्यांची इच्छा असते त्यांच्या या स्वप्नांना वास्तवात उतरविण्यासाठी अनेक कुटुंबांना त्यांनी मदत केली आहे. तर अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल कल्याणमधील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी विनोद भोईर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Post a Comment

0 Comments