कल्याण , कुणाल म्हात्रे : कोरोनाच्या महामारीमुळे गेले २ वर्ष महाविद्यालये बंद होती. अखेर विद्यार्थ्यांचं वाट पाहणं संपलं आणि २ वर्षानंतर महाविद्यालये सुरू झाली. गेल्या २ वर्षात टाळेबंदी असल्यामुळे प्रत्येक विदयार्थी हा मानसिकरित्या त्रस्त होता. यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने कल्याण भागातील कार्यकर्त्यांनी कल्याण पश्चिमेतील सोनावणे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे गंध लावून सहर्ष स्वागत केले.
अशाप्रकारे पारंपारिक पद्धतीने स्वागत झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर देखील वेगळ्याच प्रकारचा आनंद पाहायला मिळाला. तसेच महाविद्यालयातील शिक्षक वर्गाने देखील अभाविपच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
0 Comments