जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मेट्रो तर्फे उद्यान साफसफाईस सुरुवात कल्याण पश्चिमेतील राणी लक्ष्मीबाई उद्यानात स्वच्छता मोहीम
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मेट्रोच्या सदस्यांनी एकत्र येत कल्याण पश्चिमेतील राणी लक्ष्मीबाई उद्यानात स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी उद्यानात वाढलेले गवत काढण्यात आले त्याचबरोबर प्लास्टिकचा कचरा देखील उचलण्यात आला. एकीकडे उद्यानाची अवस्था अत्यंत खराब होत असतांना तब्बल ३० सदस्यांनी उद्यान स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला.            जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मेट्रोयंग जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मेट्रोश्री सत्य साई सेवा समितीसिनियर सिटीझन ग्रुप अशा विविध ग्रुपच्या सदस्यांनी यावेळी श्रमदान करत स्वच्छता केली. जायंट्स ग्रुपच्या अध्यक्षा वीणा नाईक यांनी यापुढीही आम्हीं विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याचे यावेळी कळवले.


Post a Comment

0 Comments