एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला ठाकरे सरकार जबाबदार- नरेंद्र पवार एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी
कल्याण , कुणाल म्हात्रे  :  एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न न सोडविल्याने आर्थिक विवंचनेतून अनेकांनी आत्महत्या केल्या असून याला निर्दयी ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असून कल्याण येथील आंदोलनाला नरेंद्र पवार यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.


शासन निर्णयानुसार महागाई भत्याचा दर माहे जुलै २०१८ ते माहे सप्टेंबर २०१८ या कालावधीची तीन महिन्याची २% माहे जानेवारी २०१९ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीची नऊ महिन्याची 3% महागाई भत्त्याची थकबाकी रा.प कामगारांना अद्याप मिळालेली नाही. तसेच महागाई भत्ता माहे डिसेंबर २०१९ पासून १२% वरून १७% असा लागू झालेला असून सदर वाढीव ५% महागाई भता रा.प. कामगारांना लागू करावा. राज्य शासनाने दि. १.१०.२०२१ पासून महागाई भताच्या दरामध्ये १७% हून २८% अशी वाढ केलेली असून सदर वाढीव महागाई भता माहे ऑक्टोबर २०२१ च्या वेतनासोबत रोखीने देण्याचे मान्य केलेले आहे.


 शासकीय कर्मचाऱ्यांना सध्या पासून ते आजपर्यंत फक्त १२% महागाई भत्ता दिला जात आहे ही बाब रा प कर्मचाऱ्यांनावर अन्याय करणारी आहे. माहे ऑक्टोबर २०२१ चे वेतन दिवाळीपूर्वी मिळावेसण उचल रक्कम शासकीय नियमाप्रमाणे  १२५००- दिवाळीपूर्वी देण्यात यावीतसेच दिवाळी भेट १५०००/- दिवाळीपूर्वी देण्यात यावेत अश्या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.

Post a Comment

0 Comments