विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केले धार्मिक स्थळांचे निर्जंतुकी करण
ठाणे (प्रतिनिधी)  -  राज्य शासनाच्या निर्देशानुसार गुरुवार (दि.7) सर्व धार्मिक स्थळे उघडण्यात आलेली आहेत. या धार्मिक स्थळांमधून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी मुंब्रा- कौसा भागातील सर्व धार्मिक स्थळांचे निर्जंतुकीकरण केले.            आज पहाटेचा नमाज अदा केल्यानंतर सकाळी सहा वाजेच्या सुमारास शानू पठाण हे आपल्या सहकार्‍यांसह  गौसिया मस्जिद, हज़रत फखरुद्दीन शाह बाबा दरगाह मस्जिद, तैबा मस्जिद,दारुल फलाह मस्जिद,नशेमन मस्जिद,तंवर काम्प्लेक्स मस्जिद,कौसा जामा मस्जिद,गौसिया मस्जिद शिमला पार्क,शंकर मंदिर,गणेश मंदिर,हनुमान मंदिर स्टेशन,दुर्गा माता मंदिर गाठून या मंदिरांमध्ये सॅनिटायझर आणि औषधांची फवारणी केली.            यावेळी शानू पठाण यांनी, महाराष्ट्र सरकारने लोकांच्या भावनांचा आदर ठेवून धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, जनतेनेही त्याचा गैरफायदा घेऊ नये. मास्क, सॅनिटायझर, फिजीकल डिस्टन्सींग याचा अवलंब करुन देवदर्शन करावे. जेणेकरुन पुन्हा कोरोनाचा फैलाव होणार नाही, असे सांगितले.

Post a Comment

0 Comments