टच वूड ब्रॅंड भविष्यात आंतर राष्ट्रीय बाजार पेठेत नामांकित ब्रँड ठरेल - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दि.17 :-  कोरोनाच्या विळख्यात जग सापडले असताना त्यावर मात करण्यासाठी निरोगी सदृढ शरीर प्रतिकारशक्ती वाढविण्याचे महत्व जगाला पटले आहे.त्यासाठी सेंद्रिय शेतीची उत्पादने; आरोग्यदायी  आहार याकडे जग वळले आहे. त्यामुळे भारतातील ऑरगॅनिक उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी आहे.जगाची ही नेमकी गरज ओळखून टच वूड ब्रँड ची निर्मिती झाली असून भविष्यात अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टच वूड ब्रँड एक नामांकित यशस्वी ब्रँड ठरेल असे प्रतिपादन  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.          सांताक्रूझ येथील ताज हॉटेल मध्ये टच वूड ब्रँड चे उदघाटन ना रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन टच वुड ब्रँड ची निर्मिती केल्याबद्दल या ब्रॅंडचे सी ई ओ डॉ.राजेंद्र जाधव यांचे ना रामदास आठवले यांनी कौतुक केले.यावेळी मॉरिशसहुन आलेले उद्योजक दिनेश मुंदडा; गोव्याचे काजू उत्पादक अनिल होबळे; वर्ल्ड लिंक कंपनी चे सी ई ओ सचिन बोरकर ;हरीश रावलीया; डॉ संतोषकुमार पांडे; लेखक ईश्वर भाटी; जयंती पटेल; राजेश श्रीवास्तव;आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.         टच वूड ब्रँड मध्ये भारतातील 20  वर्षांहून अधिक काळ अनुभव असणाऱ्या कंपनीच्या ऑरगॅनिक आरोग्यवर्धक  उत्पादनांचा समावेश आहे. त्यात मध; सफेद मध;काजू ; आंबापोळी; आंबा;फणस; चिंच; आवळा; कोकम आदी 40 प्रकारच्या उत्पादनांच्या  गिफ्ट बास्केटची विक्री  टच वूड ब्रँड आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत कारणार आहे. अशी माहिती यावेळी टच वूड ब्रँड चे सी ई ओ डॉ. राजेंद्र जाधव यांनी दिली.

Post a Comment

0 Comments