रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची गुरुवारी तातडीची बैठक संघटनेच्या अध्यक्षपदी प्रतीक पेणकर यांची वर्णी लागणार ?
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी, विभाग प्रमुख, स्टँड प्रमुख उपस्टॅण्ड प्रमुख यांची तातडीची बैठक गुरुवार दिनांक ७ ऑक्टोबर सायंकाळी ७ वाजता स्वर्गीय प्रकाश पेणकर  यांचे नगरसेवक  जनसंपर्क कार्यालय  बैलबाजार येथे आयोजित करण्यात आली आहे. नुकतेच प्रकाश पेणकर यांचे निधन झाल्याने संघटनेच्या अध्यक्षपदी पेणकर यांचे चिरंजीव प्रणव पेणकर यांची वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून त्याच संदर्भात ही बैठक बोलवल्याचे समजते.          समस्त रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनच्या प्रमुख पदाधिकारी व रिक्षा स्टॅण्ड विभाग प्रमुख ,स्टॅण्ड प्रमुख उपस्टॅण्ड प्रमुख यांची अंत्यत महत्वाच्या विषयावर चर्चा विनमय करण्याकरिता बैठक आयोजित केली आहे. सर्वानी वेळेवर उपस्थितीत राहण्याचे आवाहन विलास वैद्य , सुबल डे  , जाॅन कॅलिमिनो, अब्दुल शेख,  काका मढवी,  मोहन म्हाञे, शगीर शेख , नूर जमादार,  हरी भालेराव, असगर कुरेशी, आबा भसमारे, संजय बागुल, श्रीरंग दातखिळे, जनार्दन सल्पी आदींनी केले असल्याची माहिती जितू पवार आणि संतोष नवले यांनी दिली.

Post a Comment

0 Comments