नाट्यकलाकरांची दिवाळी सुरू नवीन नाट्य कलाकारांकडे लक्ष द्यावे, प्रशांत दामले यांची सरकारकडे मागणी

डोंबिवली ( शंकर जाधव ) तब्बल दीड वर्षांनी सरकारच्या अटी आणि शर्तीनुसार राज्यभरातील नाट्यगृहाचा पडदा उघडला. त्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांची  खरी दिवाळी  आजपासूनच सुरू झाली आहे असे आनंद उद्गार ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी डोंबिवली येथे काढले.        डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील नटराजाचे पूजन करून नाटकाची घंटा वाजवण्यात आली. यावेळी अभिनेते दामले यांनी सरकारकडे नवीन कलाकारांना चांगले दिवस यावे यासाठी काही सुविधा द्यावा अशी मागणी  पत्रकारांशी बोलताना केली. 


  
           एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा पहिला प्रयोग डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले  रंगमंदिर येथे शनिवारी दुपारी पार पडला. यावेळी सरकारच्या निर्णयानुसार नाट्यगृहाच्या क्षमतेपेक्षा ५० टक्के आसन व्यवस्था करण्यात आली. नाट्यगृहाची आसन व्यवस्था ९७० असून त्यामध्ये ४८५ तिकीट विक्री करण्यात आली. नाट्यरासिकांचा उत्साह पाहून अभिनेते प्रशांत दामले यांनी आनंद व्यक्त केला.  
              तसेच व्यवस्थापक दत्तात्रय लधवा  यांनीही  डोंबिवलीकर रसिक प्रेक्षकांनी सहकार्य केल्याचे सांगितले. यावेळी डोंबिवली नाट्यपरिषदेच्या सदस्य भारती ताम्हणकर यांनी नाट्य कलाकारांना बातम्या प्रेक्षकांनी साथ देणे अतिशय गरजेचे असून स्वप्नवत असणारे काळे दिवस आता संपले आहेत असे मत व्यक्त केले. यावेळी नातराजला कोकणी पद्धतीने कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी गाऱ्हाणे देखील घालण्यात आले.  
           यावेळी ज्येष्ठ लेखक आनंद म्हासवेकर, कल्याण नाट्य परिषदेचे शिवाजी शिंदे, तरुण रंगकर्मी संकेत ओेक, गुजराथी नाट्यलेखन निरंजन पांड्या, महापालिका सचिव संजय जाधव तसेच नाटक पाहण्यासाठी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ,  भांडुप येथून आलेले रसिक प्रेक्षक उपस्थित होते. महिन्यानंतर खऱ्या अर्थाने रंगभूमी आज अनलॉक झाली आहे. डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले कलामंदिरात आज तिसरी घंटा ऐकू आली आणि पडदा देखील पडला.
             नाट्यरसिक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आज खऱ्या अर्थाने पुन्हा नाट्यरसिकांना डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात अनुभवता आला. 'एका लग्नाची दुसरी गोष्ट ' या प्रायोगिक नाटकाचा प्रयोग पार पडला. राज्यात अनलॉक सुरू झाल्यापासून सर्व दक्षतेचे उपाय करून नाट्यगृह सुरू करण्यास ही परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर खरंतर सर्व नाट्यगृह सज्ज झाली आहेत. 
            अशात एका लग्नाची दुसरी गोष्ट ' नाटकाने याचा श्री गणेशा झाला आहे. तब्बल आठ महिन्यानंतर रंगभूमीचा पडदा उघडला आणि तिसरी घंटा झाली. यामुळे नाटकाचे दिगदर्शक, कलाकार, निर्माते आणि टीमने आनंद व्यक्त केला आहे तर दुसरीकडे आतुरतेने वाट पाहत असलेल्या नाट्य रसिकांनीही मोठ्या प्रमाणात नाट्यगृहाच्या बाहेर तिकीट काढण्यासाठी गर्दी केली असून नाटकाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले.चौकट


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कला सांस्कृतिक विभागाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, सोशल मीडिया सेलचे जिल्हा सरचिटणीस समीर गुधाटे, वार्ड अध्यक्ष निमेश पाटील, महिला जिल्हा सरचिटणीस विना निमकर यांनी ज्येष्ठ कलाकार प्रशांत दामले यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत नाट्यसृष्टीला चांगले दिवस येण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments