श्री भगवान आदेश्वर चौकाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या निधीतून सुशोभीकरण मुनिराज पुष्पेंद्र व मुनिराज रुपेंद्र यांच्या हस्ते लोकार्पण
कल्याण,  प्रतिनिधी  : कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या निधीतून कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या श्री भगवान आदेश्वर चौक सुशोभीकरण लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला.ज्ञानप्रेमी मुनिराज पुष्पेंद्र विजयजी (पराग) महाराज व मुनिराज रुपेंद्र विजयजी महाराज यांच्याहस्ते व माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काळा तलाव जैन सोसायटीजवळ लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी आचार्य म.सा.पूर्णचंद्र सुरी, आचार्य म.सा.युगचंद्र सुरी, साधविजी वीरेश मालाश्रि, तसेच कल्याण भाजपा शहर मंडळ अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रेसरचिटणीस अर्जुन म्हात्रेस्थानिक नगरसेवक सुधीर बासरेमाजी भाजपा कल्याण सरचिटणीस सदानंद कोकणे व नगरसेवक श्रेयश किरण समेळ आदी पदाधिकारी व जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.ढोल ताशांच्या गजरात मान्यवरांच्या उपस्थितीत निघालेल्या मिरवणुकीत अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते. सदर चौकाचे सुशोभीकरण व्हावे अशी मागणी स्थानिक जैन समाजाने नरेंद्र पवार यांच्याकडे केली होती. ही मागणी त्वरित मंजूर करीत नरेंद्र पवार यांनी आपला निधी दिला होता त्यातून श्री भगवान आदेश्वर चौकाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले.

Post a Comment

0 Comments