कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात आज ६८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ५८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.
आजच्या या ६८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४२ हजार ८७३ झाली आहे. यामध्ये ७५३ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३९ हजार ३५८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
तर आतापर्यत २७६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ६८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व –७, कल्याण प –१८, डोंबिवली पूर्व – २९, डोंबिवली पश्चिम – १२, मांडा टिटवाळा – १, तर मोहने येथील १ रुग्णांचा समावेश आहे.
0 Comments