कोविड व्हॅक्सीन शिवसेनेने तयार केल्यात का? आनंद परांजपे यांचा खा. शिंदेंना सवाल


■ठामपा आयुक्त सेनेत प्रवेश करणार आहेत का?   अन्यथा, पोलीस ठाण्याला घेराव...


ठाणे (प्रतिनिधी)  -  ठाणे शहरातील नागरिकांचे लसीकरण ठामपा करीत असताना लसीकरण केंद्रात मात्र शिवसेनेच्याा नेत्यांचे पोस्टर्स लागलेले आहेत. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीनचे मॅन्युफ्रॅक्चरींग शिवसेनेने सुरु केले आहे का? महाराष्ट्र सरकारच्या मार्फत ठामपाला आणि ठामपाच्या मार्फत ते ठाणेकरांना देण्यात येते. याचे श्रेय महााविकास आघाडीला आहे, शिवसेनेला नाही, याची जाणीव खा. शिंदे यांनी ठेवावी, असा टोला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगावला आहे.  

 


          कळवा येथे अज्ञात इसमाने राष्ट्रवादीने लावलेले कोरोना लसीकरणाचं आवाहन करणारे पोस्टर फाडले आहे. या पोस्टरवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर नेत्यांचे फोटो होतो. या पोस्टरवरून नागरिकांना कोरोनाची लस घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. हे पोस्टर पहाटे तीन वाजेच्या सुमारास फाडण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.          या संतापाला आनंद परांजपे यांनी वाट मोकळी करुन दिली. ते म्हणाले की,  आज कळवा पूर्वेकडील आनंद विहार येथे ठाणे महानगर पालिकेच्या वतीने लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी या लसीकरण शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करणारे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसने लावले होते. राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आवाहनाचे  ते बॅनर होते. काल रात्री तीन वाजता काही समाजकंटकांनी हे बॅनर फाडले.  हे बॅनर फाडणार्‍यांवर  येत्या 24 तासात  कारवाई करावी अन्यथा, आम्ही पोलीस ठाण्याला घेराव घालू. 

 


        लसीकरण ठामपा करीत असताना लसीकरण केंद्रात मात्र शिवसेनेच्या नेत्यांचे पोस्टर्स लागलेले आहेत. खा. श्रीकांत शिंदे यांनाही माझा सवाल आहे की कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीनचे मॅन्युफ्रॅक्चरिंग शिवसेनेने सुरु केले आहे का? महाराष्ट्र सरकारच्या मार्फत ठामपाला आणि ठामपाच्या मार्फत ते ठाणेकरांना देण्यात येते. याचे श्रेय महााविकास आघाडीला आहे, शिवसेनेला नाही, याची जाणीव खा. शिंदे यांनी ठेवावी.            राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या वॉर्डात शिबिरे होतात, त्यावेळी ठामपाचे बॅनर लागतात; ज्यामध्ये महापौर आणि पालिका पदाधिकार्‍यांचे छायाचित्रे असतात. पण, कळव्यात सेनेच्या नेत्यांचे फोटो लावण्याचे कारण काय,  पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे लवकरच सेनेत प्रवेश करणार आहात का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.


■तर आमची जबाबदारी नाही - डॉ. आव्हाडांचे ट्वीट


         पोस्टर फाडल्याची घटना समजल्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कळव्यामध्ये लसीकरणाच्या मोहिमेची लोकांना माहिती देण्यासाठी म्हणून लावण्यात आलेले बॅनर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी फाडले. त्याबद्दल पोलिसांनी तातडीने दखल घ्यावी. अन्यथा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काही उग्र भूमिका घेतली तर त्याची जबाबदारी आमच्यावर असणार नाही, असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments