फी न भरल्याने ऑनलाइन शिक्षण बंद राजकीय कार्यकर्त्यांनी शिक्षण विभागच्या प्रशासन अधिकाऱ्यांना धरले धारेवर

कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  शाळेची फी भरली नाही म्हणून कल्याण पश्चिमेतील ट्री हाऊस शाळेने विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण पश्चिम मध्ये घडला असून  शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊनही शाळेचा  मनमानी कारभार सुरू असल्याने राष्ट्र कल्याण पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागच्या प्रशासन अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर शाळेने विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये - ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. तसेच नववी ते बारावी या शाळा जिल्हाभर सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र आठवीपर्यंतच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळांनी ऑनलाइन शिक्षण देण्याचे सरकारने यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार खासगी माध्यमाच्या तसेच शासकीय माध्यमाच्या शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. मात्र कोरोना काळात अनेक पालकांच्या नोकरी व धंदे बंद झाल्याने अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. यामुळे काही खासगी शाळेच्या पालकांनी आपल्या मुलांचीही शाळेला भरली नाही. आता अश्या पालकांकडून शाळा प्रशासनाने पुन्हा फी वसुली सुरू केली आहे. अनेक प्रयत्न करून पालक फि भरत नसल्याने अखेर शाळेने मुलांचे शिक्षण थांबवण्याचे सुरू केल्याचे  चित्र दिसून येत आहे. अशीच एक घटना कल्याण पश्चिम मधील ट्री हाउस शाळेमध्ये घडली आहे. या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या एकाच घरातील दोन विद्यार्थ्यांचे फी न भरल्यामुळे शाळेने ऑनलाइन शिक्षण थांबवले. याबाबत मुलांच्या वडिलांनी शाळा प्रशासन व पालिका शिक्षण प्रशासनाला पत्र देऊन फी भरण्यासाठी थोडी मुदत द्यावी तोपर्यंत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवावे अशी मागणी केली. मात्र तरीही  शाळा प्रशासनाने सवलत न देता दोन्ही मुलांचे ऑनलाइन शिक्षण थांबवले. अखेर या पालकाने राष्ट्र कल्याण पार्टीच्या अध्यक्षांकडे धाव घेत मदतीची मागणी केली. राष्ट्र कल्याण पार्टीच्या अध्यक्ष शैलेश तिवारी,  हर्षद साळवी, पावन दुबे यांसह अन्य कार्यकर्त्यांनी शिक्षण अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घातला. यानंतर शिक्षण अधिकाऱ्याने लगेच शाळा  प्रशासनाला विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबविल्यास  कारवाई करणार असल्याचे सांगितल्यावर शाळा प्रशासनाने संबंधित पालकाला फीसाठी सवलत देत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण पुन्हा सुरू केले. मात्र वारंवार अशा प्रकारच्या घटना कल्याण-डोंबिवली परिसरात घडत असून फी  साठी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबवणे किती योग्य आहे आणि त्यावर अधिकारीवर्ग कठोर कारवाई का करत नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Post a Comment

0 Comments