श्री राम राष्ट्रीय काव्य पठण स्पर्धा आणि कवी संमेलनाचा अचिव्हर्स कॉलेजमध्ये समारोप
कल्याण , कुणाल म्हात्रे  :  "राष्ट्रीय काव्य संगम" आयोजित श्री राम काव्य स्पर्धेमध्ये महाराष्ट्र युनिटने जिल्हास्तरीय स्पर्धा ऑनलाईन पूर्ण केल्यानंतरराज्यस्तरीय स्पर्धा आणि भव्य "कविसंमेलन" कल्याण शहरातील अचिव्हर्स कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आले होते. जिथे प्रथम विविध जिल्ह्यातील विजेत्यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन बक्षीस देण्यात आले. यानंतर प्रांतस्तरीय स्पर्धा सुरू करण्यात आलीयामध्ये प्रथम क्रमांक प्रतीक व्यासद्वितीय शिखा त्रिपाठीतृतीय वर्षा प्रभुगावकरचौथा दीपा ओझापाचवा अवनीश बखले आणि सहावा क्रमांक मानसी दुबे हिला मिळाला. या सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले.


या कार्यक्रमात राष्ट्रीय कवी संगमचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदीश मित्तलसंरक्षक आणि आंतरराष्ट्रीय चित्रकार बाबा सत्यनारायण मौर्यअग्रवाल पॅकर्स अँड मूव्हर्सचे मालक राजेंद्र अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते बिरजू मुंद्राविजय पंडित, दिनेश सोमाणीरामसुरत पांडे आणि अचिव्हर्स कॉलेजचे अध्यक्ष महेश भिवंडीकर आणि प्राचार्य सोफिया डिसोझा उपस्थित होते. 


महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि प्रसिद्ध हास्य कवी महेश दुबे यांच्या नेतृत्वाखालीसंजय द्विवेदी आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि सह-सरचिटणीस राजेश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमातराज्यस्तरीय स्पर्धेनंतर या कार्यक्रमात  एका  कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होतेज्यात योगेश मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली बंगळुरूहून आलेले प्रसिद्ध कवी डॉ. सुनील जैन 'तरुण', कवी संजय बन्सलसंजय द्विवेदीमदनकुमार उपाध्यायकवी सत्यदेव विजयअनिल कुमार राही आणि उमेश शर्मा यानी त्यांच्या कविता वाचल्या. राष्ट्रीय अध्यक्ष जगदीश मित्तल यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments