भिवंडीत बचत गट मेळावा;  बचत गटाने निर्माण केलेल्या वस्तू खरेदी करा, बचत गटाला प्रोत्साहित करा... महापौर प्रतिभा विलास पाटील
भिवंडी , प्रतिनिधी  : भिवंडी पालिका बचत गटाच्या  माध्यमातून दिवाळी निमित्त दिवाळी फराळ साहित्य व अन्य प्रदर्शन व  साहित्याची  विक्री, यांचा मेळावा प्रदर्शन आयोजित केले आहे त्याचे महापौर प्रतिभा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी महापौर प्रतिभा विलास पाटील शहरातील  नागरिकांना आवाहन केले की, बचत गट महिलांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करा, या आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा असे आवाहन महापौर यांनी केले.           भिवंडी पालिकेच्या मुख्यालय जवळ  दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना, राष्ट्रीय  नागरी उपजीविका विभाग व महिला बालकल्याण   विभागाच्या वतीने आयोजित बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन तसेच दिवाळी साहित्य विक्री मेळाव्याचे उद्घाटन मा.महापौर सौ.प्रतिभा विलास पाटील यावेळी   मा.आयुक्त श्री.सुधाकर देशमुख उपस्थित होते.त्यावेळी महापौर प्रतिभा विलास पाटील बोलत होत्या. 


           नागरिकांनी बचत गटाने तयार केलेल्या वस्तू विकत घेऊन बचत गट महिलांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी सदर उद्घाटनाच्या वेळी केले. या मेळाव्यात 22 गटांनी सहभाग नोंदवला. हे प्रदर्शन दिनांक 29 ऑक्टोंबर पासून ते  1 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे, सकाळी 9 ते रात्री 9 वा.पर्यंत सुरू राहणार आहे. 


             या प्रसंगी शहर स्थरसंघ आणि वस्ती स्थर संघाच्या   अध्यक्षा श्रीमती.चंदा बॅनर्जी, सुशीला कांबळे, उज्ज्वला बनगे, रमा अंक्कंम, रमा बोदुला, महिला बालविकास व मविम चे कर्मचारी उपस्थित होते.. सदर कार्यक्रमास उपस्थित  विभागाचे श्री.कैलास पाटील,श्री.संजय ठाकरे , श्रीमती सारिका परदेशी , ईस्टर रायबोर्दे ,समूह संघटक धनश्री मेस्त्री . महिला बाकल्याण विभाग प्रमुख श्री.स्नेहल पुण्यार्थी तसेच माविमचे श्रीमती. सुरेखा , शितल व विकास.  हे कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments