विटाव्यातील महापालिकेच्या उद्यानाचा वापर 'धोबी घाटासाठी'!तुटलेली खेळणी, बाकडी व वाढलेल्या गवतामुळे दुरावस्था





कळवा  , अशोक घाग  :  ठाणे महापालिकेच्या विटावा खाडी किनारी गणेश विसर्जन घाटा  जवळ असलेल्या उद्यानाची गेल्या काही वर्षांपासून दुरवस्था झाली असून या उद्यानामध्ये बसविण्यात आलेली खेळणी व व्यायामचे बसविण्यात आलेली लोखंडी खेळणी,बसायची बाकडे तुटले असून गवत ही वाढले आहे.या उद्यानाची सध्या प्रचंड दुरावस्था निर्माण झाली आहे.सध्या हे उद्यान धोबीघाट तयार झाले असून मोकळ्या उद्यानात येथील धोबी व मंडप व्यवसायिक धुतलेले कपडे सुकविण्यासाठी वापर करीत आहेत.


           गेल्या दहा वर्षांपूर्वी माजी नगरसेवक सुभाष खारकर व राजेश खारकर यांच्या प्रयत्नांतुन विटाव्यातील जेष्ठ नागरिक,महिला व लहान मुलांना विटावा खाडी किनाऱ्यावर फ़िरायला आल्यावर विरंगुळा मिळावा लहान मुलांना खेळता यावा व जेष्ठ नागरिक व महिलांना हलका व्यायाम करता यावा म्हणून आपल्या नगरसेवक निधीतून हे खेळण्याच्या व व्यायामाच्या साहित्यासह येथे छोटेखानी उद्यान उभारले आहे.परंतु त्याची आता प्रचंड दुरवस्था झाली असून त्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.


 
          सध्या विटावा खाडीकिनारी असलेल्या गणेश विसर्जन घाटाजवळ सकाळी व संध्याकाळी या परिसरातील नागरिक फिरायला येतात तसेच नागरिकांची मागणी आहे की लवकरात या उद्यानाची डागडुजी करून चालू करण्यात यावे सध्या या उद्यानाच्या दुरवस्थामुळे नागरिकांची  हिरमोड होत आहे आज विटावा परिसरामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ हजार वस्ती आहे आणि विटावा परिसरात हे एकमेव छोटेखानी उद्यान आहे.



           या परिसरातील लहान मुलांना ही खेळायला 'उद्यान
'नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.त्यामुळे या उद्या नाचे नव्याने नूतनीकरण करून अद्यावत हे उद्यान निर्माण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. " या उद्यानाच्या नूतनीकरणा साठी महापालिकेकडे प्रस्ताव पाठवला होता तो आता मंजूर झाला आहे "  प्रियांका पाटील, स्थानिक नगरसेविका

Post a Comment

0 Comments