स्वर उत्सवाच्या माध्यमातून आर्य गुरुकुल शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
कल्याण ,कुणाल  म्हात्रे  :  सोमवार पासून राज्यात शाळा सुरु होणार असून कोरोनामुळे एकप्रकारे मानसिक दडपण आलेल्या विद्यार्थ्याचे कल्याण पूर्वेतील आर्य गुरुकुल शाळेने स्वर उत्सवाच्या माध्यमातून अनोखे स्वागत केले आहे. आज गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून नांदिवली मधील आर्य गुरुकुल शाळेच्या वतीने गौरी कवी आणि सहकारी यांच्या "स्वरधारा" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे गांधीजींची वेशभूषा केलेले गृहस्थ सर्वांचे आकर्षण ठरले होते. या गांधीजीनी उपस्थित विद्यार्थांना कोरोना नियम पाळण्याची शपथ दिली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक देखील सहभागी झाले होते.       एज्युकेशन टुडे फाउंडेशनचे संस्थापक भरत मलिक आणि डॉ नीलम मलिक यांनी ४ ऑक्टोबर  पासून शाळा पुन्हा सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा आनंद साजरा करण्यासाठी "स्वर उत्सव" सह विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला. स्वरताल आणि शब्दांच्या मोहक संयोगाने संगीत तयार केले जाते. याचा पुरावा म्हणजे ३३  कोटी देवतांच्या हातात नक्कीच काही वाद्य आहे. संगीत हे खूप व्यापक आहे म्हणूनच संगीत केवळ सणप्रार्थना आणि सत्संगांमध्येच नव्हे तर युद्ध आणि दुःखांमध्येही आपली भूमिका चोख बजावते असे मत भरत मलिक यांनी व्यक्त केले.गांधीजींच्या प्रतिमेबरोबर लाठी आणि चरखा डोळ्यासमोर येतो. परंतु फार कमी लोकांना माहित आहे की गांधीजींचा असा विश्वास होता की भारतामध्ये स्वातंत्र्य संग्राम संगिताशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांनी संगित हे लोकांना सत्याग्रहाशी जोडण्याचा एक मार्ग मानला. नरसी मेहता यांचे स्तोत्र वैष्णव जन तो” हे गांधीजींना खूप प्रिय होते. आज देशाला पुन्हा स्वातंत्र्य हवे आहे,  कोरोनापासून स्वातंत्र्यतर आपण सर्वांनी पुन्हा एकदा गांधीजींच्या प्रेरणेने कोरोनापासून मुक्तीचे रणशिंग वाजवू या आणि तणावमुक्तभयमुक्त वातावरणातून बाहेर येऊया असे आवाहन मलिक यांनी उपस्थितांना केले. 

Post a Comment

0 Comments