अभिनय कट्ट्यावर वाजली पुन्हा एकदा तिसरी घंटा: अभिनय कट्ट्याच्या शोधकलाकारांचा या उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण
ठाणे, प्रतिनिधी  : अभिनय कट्टा म्हणजे ठाण्याच्या सांस्कृतीक चळवळीतील अग्रस्थानी असलेली एक नाव. आदित्य प्रतिष्ठान ठाणे ही संस्था गेली बावीस वर्ष कला,क्रीडा व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असुन गेली अकरा वर्षे अभिनय कट्टा दर रविवारी सातत्याने सुरू आहे. साहित्य, कला, क्षेत्रातील अनेक दिग्गज लेखक, अभिनेते, दिग्दर्शक यांनी आपली हजेरी लावत नेहमीच कट्ट्याचे कौतुक केले आहे. त्यांचप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून हजारो हौशी कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी अभिनय कट्ट्याने दिली आहे.
          एकपात्री, द्विपात्री अभिनय स्पर्धा , एकांकिका तसेच नाट्यमहोत्सवाचे आयोजन सुध्दा करण्यात येते.  अभिनय कट्टा म्हणजे प्रत्येक रंगकर्मीचा जणू मोकळा श्वास घेण्याचे ठिकाण आहे. या कोरोनाकाळातील कठीण काळात जवळपास पावणेदोन वर्षाच्या प्रत्यक्ष अभिनय कट्ट्याच्या सादरीकरणावर आलेल्या व्यत्ययानंतर रविवारी पुन्हा एकदा अभिनय कट्ट्यावर तिसरी घंटा वाजली. पुन्हा एकदा तिसरी घंटा या शीर्षकाखाली अभिनय कट्ट्याच्या ४९७ क्रमांकाच्या कट्ट्याला सुरुवात झाली.        फार पूर्वी नाटकाचा पडदा उघडताना घंटा वाजवून रंगमंचला मानवंदना दिलीजात असे त्याचप्रमाणे अभिनय कट्ट्या वरील संभाजी आंद्रे यांनी त्याच पोषाखात येऊन तिसरी घंटा वाजवली. नंतर लागलीच शुभारंभासाठी उपस्थित नाट्य मालिका अभिनेते सुनील गोडसे यांच्या हस्ते नटराजाचे पूजन करण्यात आले. तसेच ज्येष्ठ साहित्यीक डॉ.र.म. शेजवल करयांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.
           सुप्रसिध्द अभिनेते संदीप जुवाटकर, गणेश जेठे, जेष्ठ रंगभूषाकार दीपक लाडेकर, माजी जेष्ठ नगरसेवक भास्कर पाटील, दिव्यांग विध्यार्थी आरती गोडबोले, वुई आर फॉर यू चे विजय डावरे व संचालक किरण नाकती यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.हरिष सुतार या संगीत कट्ट्याच्या गायकाने गणेशवंदना म्हणत सादरीकरणाला सुरुवात केली व संपूर्ण वातावरण प्रसन्न झाले. 
        इरावती कर्णिक यांच्या दोघी याकथेचे अभीवाचन राजश्री गढीकर यांनी केले. अभिनय कट्ट्याचा बाल कलाकार चिन्मय मौर्य यांने आत्महत्या करण्याचा विचार करत वेगवेगळी कारण काढून आत्महत्या टाळण्याचा प्रयत्न करणार्‍या एका विध्यार्थाची भूमिका साकारत आत्महत्या नावाची विनोदी एकपात्री सादर केली. तसेच शिवम सुळे या सहा वर्षाच्या चिमुकल्याने अगंबाई ढंगूबाई हे गाणं म्हंटले.         डॉ र. म.शेजवलकर,सई कदम, गणेश जेठे, आदित्य नाकती,परेश दळवी यांनी विविध कवितांचे वाचन करुन काव्य मैफल रंगवली.राजन मायेकर व आदित्य कदम यांनी पुनश्च हरिओम ही द्विपात्रीसादर करत दीड वर्षे रंगभूमीपासून दूर राहिलेल्या कलाकारांची  व्यथा मांडत त्या कोरोना काळात किरण नाकती यांच्या व सहकाऱ्यांच्या कार्याचा पाढा वाचत अंगावर काटा आणणारा द्वीपात्री  प्रयोग सादर केला.
          अभिनय कट्ट्याच्या शोध कलाकारांचा या एका नवीन उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण  ठाणेवैभव संपादक मिलिंद बल्लाळ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. फुग्यांच्या मागे दडलेल्या या पोस्टर वरील फुगे फोडत अभिनव पध्दतीने हे अनावरण करण्यात आले. शोध कलाकारांचा या उपक्रम अंतर्गत ठाण्यातील प्रत्येक कुटुंबातील अंगीभूत कलागुण असलेल्या सदस्यांनी आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.        अभिनय, नृत्य, गायन,विविध कलांचे वादन, चित्रकला हस्तकला,कथावाचन, काव्यवाचन, शालेयविध्यर्थीसाठी  शालेय  पाठयापुस्तकातील कविता किंवा धाड्याचे वचन व इतर ज्याकही अंगीभूत कला असतील त्या सुप्त कलागुणांना  अभिनय कट्ट्याच्या व्यासपीठावर वाव देण्याच्या हा प्रयत्न असणार आहे. कोरोंनाच्या नैराश्यामय कळानंतर या दिवाळीपासून या उपक्रमाला सुरुवात होणार असल्याची माहिती किरण नाकती यांनी दिली.          याची सुरुवात नौपाडा विभागातून होऊन टप्प्या  टप्प्याने संपूर्ण ठाणे शहारातील नागरिकांसाठी असणार आहे. याची संपूर्ण माहिती व गुगल फॉर्म किरण नाकती व अभिनय कट्टा या दोन्ही फेसबूक पेजवर उपलब्ध होणार आहेत. शोध कलाकारांचा संदर्भात अधिक महितीसाठी ८४५१०५४५४८ या मोबाईल क्रमांकावार आपण संपर्क साधू शकता. दिवाळीविविध कला प्रकारांच्या मेजवानीची भेट अभिनय कट्टा ठाणेकरांना देणार असल्याचे समजताच उपस्थित प्रेक्षक आनंदित होत भारवून गेले.            या अनावरण सोवल्यानंतर पुन्हा एकदा कट्ट्याला सुरुवात झाली. संगीत कट्याचे विनोद पवार व अनंत मुळे यांनी सुध्दा आपल्या गाण्यांची उपस्थित प्रेक्षकांना खुश केले. तसेच दिव्यांग कला केंद्राच्या पार्थ खडकबाण यांने जोगवा नृत्य सादर करीत प्रेक्षकांची मनं  जिंकली .              या कट्ट्याचे निवेदन माधुरी कोळी यांनी केले. त्याच प्रमाणे या विशेष कट्ट्याचे औचित्य  साधून बाप्पा आपल्या अंतर्गत वुई आर फॉर यू व नौपाडा युथ च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या बाप्पा आपला या गणेशोत्सव घरगुती सजावट, आरती गायन व सेल्फी विथ बाप्पा या स्पर्धेचा बक्षीस समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पाडण्यात आला.

Post a Comment

0 Comments