सेल्फी विथ रांगोळी स्पर्धा प्रभाग क्र.२२मधील महिलांसाठी आपला माणूस प्रतिष्ठानचा उपक्रम
ठाणे, प्रतिनिधी  : ठाण्यातील आपला माणूस प्रतिष्ठानच्या वतीने यंदाच्या दिवाळीनिमित्त प्रभाग क्रमांक 22मधील टेंभी नाका, खारकर आळी, महागिरी, खारटन रोड, मार्केट, पोलीस लाईन, जांभळी नाका परिसरातील महिलांकरिता 'सेल्फि विथ रांगोळी स्पर्धा' ४ ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.


          या स्पर्धेत आपण आपल्या दरवाजासमोर काढलेल्या रांगोळीचा एक फोटो व याच रांगोळीसोबतचा स्वतःचा एक सेल्फी फोटो 8879382239 या क्रमांकावर पाठवायचा आहे. या स्पर्धेत पहिले पारितोषिक 5, 500 रुपये किमतीचे 1 ग्रॅमचे मंगळसूत्र, दुसरे पारितोषिक 4,500 रुपये किमतीचा 1 ग्रॅम तीन पदरी राणीहार, तिसरे पारितोषिक 3,500 रुपये किमतीचा 1 ग्रॅम नेकलेस हार व 10 उत्तेजनार्थ 1 ग्रॅमचे  झुमके अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.


              प्रत्येक सहभागी स्पर्धकास हमखास घरपोच भेटवस्तू देण्यात येणार आहे. या स्पर्धेतील स्पर्धक  प्रभाग क्रमांक 22 मधील रहिवासी असावा, अशी अट असून 3 नोव्हेंबरपूर्वी आलेली नावे स्पर्धेसाठी स्वीकारली जाणार आहेत. स्पर्धेचा अंतिम निकाल व पारितोषिक वितरण मराठी अभिनेत्री (सेलिब्रेटी)सोबत करण्यात येणार असून या स्पर्धेला ठाण्यातील जांभळी नाका येथील सुप्रसिद्ध जयश्री कलेक्शन यांचे सहकार्य लाभले आहे.


            या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 8097223939 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजक सचिन शिंदे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments