रिक्षा चालकां वरील दंडात्मक कारवाई थांबवा... बसपाचे वाहतूक पोलिसांना निवेदन
डोंबिवली ( शंकर जाधव ) करोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.आर्थिक बंदीच्या या काळात टाळेबंदीमुळे दैनदिन जीवन जगण्यास सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.हातावर पोट असणाऱ्या अनेक घटनांपैकी रिक्षाचालक हा एक महत्वाचा घटक असून त्याच्याचीही आर्थिक कोंडी झाली आहे. अश्यात वाहतूक पोलीस रिक्षाचालकांवर असलेल्या दंडात्मक कारवाई सुरु असल्याने जगावे कसे असा प्रश्न रिक्षाचालकांना पडला आहे.बहुजन समाज पार्टीने याकडे गांभीर्याने लक्ष देत रिक्षाचालकांवरील दंडात्मक कारवाई थांबवा अशी मागणी करत डोंबिवली वाहतूक पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांना निवेदन दिले.        ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दामोदर काकडेठाणे जिल्हा सचिव आनंद आहीरेडोंबिवली विधानसभा उपाध्यक्ष अशोक मोरेडोंबिवली शहर महासचिव नितीन सोनवणेडोंबिवली शहर कोषाध्यक्ष दत्ता सोनवणेडोंबिवली कार्यकर्ते - सागर निकममिलिंद भुजबळ,  प्रशांत टेकुळे यांनी डोंबिवली वाहतूक पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांना निवेदन दिले. यावेळी काकडे म्हणाले, डोंबिवली शहरात रिक्षाचालकांची संख्या वाढली आहे,अनेक कर्जबाजारी रिक्षाचालकांना आपले जीवन नकोसे झाले आहेत.डोंबिवलीत वाहतूक पोलीस करत असलेल्या दंडात्मक कारवाईने रिक्षाचालकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. रिक्षाचालकांवर आर्थिक संकट दूर होत नाही तोवर कारवाई करू नये अशी मागणी निवेदनद्वारे केली आहे.
         जे रिक्षाचालक दारू पिऊन रिक्षा चालवतात,नियमांचे पालन करत नाही अश्यांवर पोलिसांनी कारवाई केलीच पाहिजे. मात्र त्यामुळे सर्व रिक्षाचालकांना याचा त्रास होणार नाही याची दक्षताही घेतली पाहिजे.यावर डोंबिवली वाह्तुक पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांना विचारले असता ते म्हणाले, जे नियम पाळत नाही अश्या रिक्षाचालकांवर कारवाई केली जाते. प्रवाश्यांच्या तक्रारी आल्यावर कारवाई केली जाते.रिक्षाचालक हे आमचे शत्रू नाही. प्रामाणिक रिक्षाचालकांना आमचे सहकार्य असते. जाणूनबुजून कोणावरही कारवाई करत नाही.

Post a Comment

0 Comments