देशातील पहिले स्वदेशी ऍप 'सँडस्टोनप्रो'चे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते लोकार्पण


यूट्यूबच्या धर्तीवर साकार झालेले   स्वदेशी ऍप 'सँडस्टोनप्रो नक्की यशस्वी होईल

 

मुंबई दि. 16 :-  यूट्यूब' सारखे नवीन ऍप सँडस्टोनप्रो हे  भारतीयांनी निर्माण  केलेले  देशातील पाहिले स्वदेशी ऍप आहे. सँडस्टोनप्रो या स्वदेशी ऍप चे माझ्या हस्ते लोकार्पण केल्याचा मला अभिमान आहे.या  स्वदेशी ऍप चा सर्व भारतीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी सँडस्टोनप्रो हे ऍप करेल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.  केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या हस्ते बांद्रा येथे  स्वदेशी खुले ओटीटी  ऍप 'सँडस्टोनप्रो' चे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.         यावेळी 'सँडस्टोनप्रो'चे चेयरमन पंकज कमल, सीईओ चित्ता यज्ञेश शेट्टी, व्यवस्थापकीय संचालक आरती कमल, संचालक दीपक वर्मा आणि संदीप मालानी, मुख्य सल्लागार मोहम्मद इम्तियाज, मार्केटिंग हेड महाराष्ट्र केतन शाह, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह महाराष्ट्र स्वाती संदीप बागडे, मॅनेजर सुनीता घोरावत, उत्तर भारत प्रमुख अशोक कुमार, बंगाल प्रमुख सायक रॉय, मीडिया प्रभारी आणि कंटेंट हेड कृष्णा के शर्मा.स्वदेशी ओपन ऍप 'सँडस्टोनप्रो' चे अध्यक्ष पंकज कमल म्हणाले की, सँड स्टोन प्रो या स्वदेशी ऍप चे वैशिष्ट्य असे आहे की  या ऍप मध्ये तुम्ही तुमचे स्वतःचे चॅनेल तयार करू शकता आणि चित्रपट, व्हिडिओ, वेब सीरीज, लघुपट इत्यादी रिलीज करून पैसे कमवू शकता.            यात अनेक प्रगत वैशिष्ट्ये आहेत. जेणेकरून निर्मात्याला जास्त त्रास होणार नाही आणि उच्च दर्जाचे कार्यक्रम बनवता येतील. यात स्वतःचे सेन्सॉर बोर्ड आहे, ज्यात चित्रपट सेन्सॉर  झाल्यानंतरच प्रदर्शित केले जातील. सर्व प्रकारचे मनोरंजन कार्यक्रमाचे पर्याय त्यात ठेवण्यात आले आहेत. व्हिडिओ गाणी, ऑडिओ गाणी, स्टॉक व्हिडिओ, स्टॉक प्रतिमा, स्टॉक ऑडिओ इत्यादींची एक श्रेणी देखील आहे. यामध्ये तुम्हाला चित्रपट प्रक्षेपण होण्याची दिनांक, बनवल्या जाणाऱ्या चित्रपटांची माहिती आणि प्रोमो इत्यादि माहिती उपलब्ध आहे.          सँड स्टोन प्रो हे पहिले भारतीय ओटीटी ऍप आहे. या ऍप ला भारतीयांनी पसंती देऊन यशस्वी करण्याचे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments