शहापूर सारख्या आदिवासी भागात ८१ निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान


■द्वारली पाडा-कल्याण येथील लसीकरण शिबिरात २२९ नागरिक लाभान्वित...


कल्याण , कुणाल म्हात्रे  संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवारी शहापूरसारख्या आदिवासी तालुक्यात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ८१ निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. मिशनच्या शहापुरवासिंद आणि कसारा या शाखांमधील निरंकारी भक्तगणांनी माझ्या नसानसातून वाहते मानवता’ या उदात्त भावनेने मोठ्या उत्साहाने या शिबिरात भाग घेतला. जे.जे.महानगर रक्तपेढीमुंबई यांनी या शिबिरात रक्त संकलन केले.       या शिबिरामध्ये संत निरंकारी मंडळाच्या डोंबिवली झोनचे क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबेसेवादल क्षेत्रीय संचालक जनार्दन म्हात्रेकल्याणचे सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे तसेच वासिंद व कसारा शाखांचे मुखी नितिन ढगे व शांताराम ठवले यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांचा उत्साह वाढविला. शहापूर शाखेचे मुखी शैलेंद्र सकपाळे आणि शहापूर सेवादल युनिटचे संचालक यतीन भोईर यांनी शिबिराच्या आयोजनामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले.       संत निरंकारी मिशन आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मांगरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने संत निरंकारी सत्संग भवनद्वारली पाडाकल्याण (पूर्व) येथे शनिवारी  आयोजित करण्यात आलेल्या कोविड-१९ लसीकरण शिबिरामध्ये मिशनचे अनुयायी व स्थानिक नागरिक मिळून २२९ लोकांचे लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये कोविशिल्ड लसीचे पहिले व दुसरे डोस देण्यात आले.       या शिबिरामध्ये मिशनच्या वतीने संत निरंकारी मंडळाचे डोंबिवली झोनचे प्रभारी तसेच कल्याणचे सेक्टर संयोजक आवर्जून उपस्थित होते. तर आरोग्य केंद्राच्या वतीने समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ.कर्माणी जाधव उपस्थित होते. संत निरंकारी मंडळाच्या द्वारली शाखेचे मुखी दशरथ म्हात्रे आणि स्थानिक प्रबंधक सुनील म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादल सदस्यांच्या सहयोगाने हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले.

Post a Comment

0 Comments