भरधाव रिक्षातून नागरिकांचे मोबाईल खेचणाऱ्या चोरट्याला अटक

 डोंबिवली ( शंकर जाधव ) रस्त्यातून पायी चालत जाणाऱ्या एखाद्या नागरिकाला टार्गेट करून भरधाव रिक्षातून नागरिकांचे मोबाईल खेचणाऱ्या चोरट्याला अटक करण्यास मानपाडा पोलिसांन यश आले. अटक आरोपी रिक्षा आणि मोटरसायकलीचा वापर करत होता.या प्रकरणी चोरट्याकडून  मानपाडा पोलिसांनी ३१ मोबाईल व गुन्हात वापरलेली रिक्षा जप्त केली.

 


         पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सुफीयान उर्फ सद्दो मलिक बगवान ( २५ ) भिवंडी येथील नवी वस्ती, साई बाबा मंदिराजवळ राहतो.२२ सप्टेबर रोजी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वकडील पिंपळेश्वर मंदिराच्या पाठीमागील गेट समोरील रस्त्यावर रामकुमार मुन्सी सिंह ( ४८ ) हे पायी चालत असताना अचानक पाठीमागून आलेल्या रिक्षा क्र.एम.एच.०४ एफ सी ६३८८ मधून आरोपी सुफीयान याने मोबाईल खेचला.        रामकुमार यांनी आरडा-ओरड केलिया मात्र तोपर्यत रिक्षा भरधाव वेगाने पुढे गेली होती.मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यावर तपास सुरु केला.हाती लागलेल्या माहितीनुसार व खबऱ्याच्या माहितीवरून पोलिसांनी चोरटा सुफीयान याला अटक केली.अटक आरोपीने कल्याण येथील कोळसेवाडी व डोंबिवली पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल चोरी केली असल्याची कबुली पोलिसांन दिली.       

 

Post a Comment

0 Comments