अखेर दोन वर्षांनी डोंबिवलीतील कॉंग्रेस कार्यालय उघडले.... धोकादायक इमातीतीत कार्यालय..
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर कॉंग्रेसने राष्ट्रवादीबरोबर आघाडी करत फक्त एकदाच अडीच वर्षासाठीउपमहापौर पद मिळवले होते.त्यानंतर कल्याण-डोंबिवलीत कॉंग्रेसला आपली ताकद वाढवता आली नाही.देशात पातळीवर राजकारणात आपला ठसा उमटवीलेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पार्टीला स्थानिक पातळीवर मात्र आपले मोठे व चांगले कार्यालय घेता आले नाही हे दिसून आले आहे.          डोंबिवली शहातील कॉंग्रेस पार्टिचे जनसंपर्क कार्यालयाकडे प्रदेश, जिल्हा आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्याने अस्वच्छता झाली होती.तब्बल दोन वर्षांनी डोंबिवलीतील हे कार्यालय उघडण्यात आले.कार्यालय उघडल्यावर आतील अस्वच्छता पाहून पक्ष कार्यालयप्रमुखाने कार्यालय स्वच्छ केले. मात्र तरीही कार्यालयातील कुबट वास जात नसल्याने अश्या कार्यालयात आम्ही कसे बसतील असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.४० वर्ष जुनी असलेल्या इमातीतीत हे कार्यालय आहेत.   छोटसी खोली,खराब खुर्च्या,बसण्यासाठी जेमतेस चार-पाच जणांना जागा,अडगळीत ठेवलेले समान व साचलेली  घाण आणि कुबट वास असे हे डोंबिवलीतील कॉंग्रेसचे जनसंपर्क कार्यालय गेली दोन वर्ष बंद होते.सोमवारी १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पक्ष कार्यालय प्रमुखाने हे कार्यालय उघडल्यावर त्यांना कार्यालयाची अवस्था पाहवली नाही. त्यांनी झाडू घेऊन कार्यालय झाडून घेतले.मात्र तरीही कार्यालयात कुबट वास येत होता.       डोंबिवलीत प्रदेश सचिव  संतोष केणे, जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे,कार्याध्यक्ष जितेंद्र भोईर, शहर ब्लॉक अध्यक्ष सदाशिव शेलार, नवेंदू पाठारे,गणेश चौधरी,हृदयनाथ भोईर हे आहेत.मात्र तरीही कार्यालयाची अशी अवस्था झाल्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.पक्षाच्या बैठका व कार्यक्रम याचा कार्यालयात होत असल्याने कार्यालयाकडे लक्ष दिले गेले नाही.कॉंग्रेस पक्षातील मोठ्या नेत्यांना डोंबिवलीतील कार्यालयाच्या दुरवस्थेबाबत माहिती दिल्यास व नेतेमंडळींनी कार्यालयाला भेट देऊन वस्तुस्थिती पाहण्याची वेळ आली आहे. चौकट


 धोकादायक  इमारतीत कॉंग्रेसचे जनसंपर्क कार्यालय...  


   डोंबिवलीतील कॉंग्रेसचे जनसंपर्क कार्यालय धोकादायक इमारतीत आहे.या इमारतीला ४० वर्ष पूर्ण झाली असून इमारतीकडे पालिका प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर कॉग्रेसचे छोटेसे कार्यालय आहेत.या इमारतीत पदाधिकारी आणि कार्यकर्ते बैठका घेण्यापुरतीच येत असतात. कार्यालयाची अवस्था सर्व पदाधिकाऱ्यांना जनसंपर्क कार्यालयाच्या दुरवस्थेबाबत माहिती आहे.मात्र नवीन जनसंपर्क कार्यालय घेण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याचे दिसते.चौकट


 जनसंपर्क कार्यालयात पिण्याचे पाणी नाही...  


या कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या बैठका आणि सभा होत असतात. मात्र कार्यालयात पिण्यासाठी पाण्याची सोय नाही.पदाधिकारी आणि कार्यकर्ते पिण्याचे पाणी सोबत घेऊनच कार्यालयात येत असतात.त्यामुळे डोंबिवलीतील हे कार्यालय पदाधिकाऱ्यांच्या नजरेत नसल्यासारखेच असल्याचे दिसते.


कार्यालयाला वीज पुरवठा कुठून होतो  ?


या कार्यालयाला वीज मीटर लावले नसल्याने वीज पुरवठा कुठून होतो ? कार्यालयाचे वीज बिल कोण भरते ? असा प्रश्न विचारला जात आहे.तर वीज बिल भरण्याकडेही कॉंग्रेस पदाधिकारी पाठ दाखवत असल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

Post a Comment

0 Comments