स्‍कॉटिश लीडर - अवॉर्ड विजेती ब्‍लेण्‍डेड स्‍कॉच व्हिस्‍की आता भारतामध्‍ये उपलब्‍ध


ब्‍लेण्‍डेड स्‍कॉच व्हिस्‍कीला २०१६ पासून ५३ पुरस्‍कार मिळाले आहेत जगातील सर्वात तरूण मास्‍टर ब्‍लेण्‍डर ज्‍युलियन फर्नांडिसचे नेतृत्‍व ...


मुंबई - १२  ऑक्टोबर  : डिस्‍टेल ग्रुप आणि अॅस्‍प्री स्पिरिट्स प्रा. लि. २००८ पासून एकत्र काम करत आले आहेत आणि भारतामध्‍ये अमरूला फ्रूट क्रीम लिक्वियर, नेडरबर्ग आणि टू ओशियन्‍स रेंज ऑफ वाइन्‍स असे विविध ब्रॅण्‍ड्स यशस्‍वीरित्‍या सादर केले आहेत.         डिस्‍टेल इंटरनॅशनल आणि अॅस्‍प्री स्पिरिट्स प्रा. लि. यांनी भारतामध्‍ये स्‍कॉटिश लीडर सादर करण्‍यासाठी सहयोग केला आहे. ब्रॅण्‍डला मिळालेल्‍या यशानंतर कंपन्‍यांनी त्‍यांचा सहयोग अधिक दृढ करत भारताच्‍या झपाट्याने विकसित होणा-या व्हिस्‍की विभागामध्‍ये प्रवेश करण्‍याचे ठरवले आहे.           भारत मंदावलेल्‍या जागतिक दृष्टिकोनाच्‍या विस्‍तारीकरणासाठी एक आशा आहे, जेथे भारत देश हा झपाट्याने विकसित होणारी प्रमुख अर्थव्‍यवस्‍था असल्‍याचा अंदाज आहे. २०२५ पर्यंत उत्‍पन्‍न पातळ्या तिप्‍पट होण्‍याची अपेक्षा असून आगामी दशकांमध्‍ये शहरी बाजारपेठ वापरासंदर्भात दोन-तृतीयांश वाढीचे योगदान देईल. तसेच स्‍कॉच विभागाने प्रबळ वाढ दाखवली आहे, ज्‍यामुळे भारतीय बाजारपेठेमध्‍ये 'स्‍कॉटिश लीडर' ब्रॅण्‍डसाठी मोठी क्षमता आहे.              डिस्‍टेल एशिया पॅसिफिक डिस्‍टेल ग्रुपचे व्‍यवस्‍थापकीय संचालक गुरेक डॅनो म्‍हणाले, ''भारत ही मोठी आणि झपाट्याने विकसित होणारी स्‍कॉच व्हिस्‍की बाजारपेठ आहे. २०१७ मध्‍ये भारतात स्‍कॉटिश लीडर लाँच केल्‍यापासून ग्राहकांकडून सकारात्‍मक परिणाम मिळाला आहे, म्‍हणून आम्‍ही अॅस्‍प्री येथील आमच्‍या दीर्घकाळापासूनच्‍या सहयोगींसोबतच्‍या सहयोगाला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याचे ठरवले आहे.              स्‍कॉटिश लीडरमध्‍ये संपूर्ण टीमला अॅस्‍प्रीसोबत सहयोगाने भारतीय ग्राहकांसाठी आकर्षकरित्‍या तयार केलेले स्पिरिट (मद्य) सादर करण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की, आम्‍ही केलेल्‍या प्रयत्‍नाइतकेच ते आमच्‍या व्हिस्‍कीचा आस्‍वाद घेतील आणि त्यांना व्हिस्‍की खूप आवडेल.''   

Post a Comment

0 Comments