जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे नवरात्र उत्सवा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
कल्याण , कुणाल  म्हात्रे   : जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे नवरात्र उत्सवानिमित्त स्त्रीशक्तीचा जागर करत शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये चित्रकला, वकृत्व स्पर्धा, पत्रलेखन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, स्पेलिंग रायटिंग स्पर्धा, प्रश्न मंजुषा, तर शेवटच्या दिवशी पंचायत समितीच्या माजी सभापती ललिता पाटील व ग्रामपंचायतीच्या सदस्या मनिषा दीपक भोईर, रीना पाटील, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रमिला कडू यांची मुलाखत विद्यार्थ्यांनी घेतली.             नवरात्र उत्सव मध्ये राहनाळ शाळेत ह्या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल असून हे आमच्या गावची शान आहे असे उद्गार मनिषा भोईर यांनी काढले. तर राहनाळ शाळेमध्ये चालणाऱ्या या विविध उपक्रमांचे अभिनंदन आणि कौतुक ललिता पाटील यांनी केले. मुलाखतीच्या दरम्यान रिना पाटील यांनी सांगितले की मी सामान्य कुटुंबातली असूनही ग्रामपंचायतीची सदस्य झाले. 
              गावाचा विकास व्हावा हे हे माझं स्वप्न आहे. तर मनिषा भोईर यांनी आपल्या कॉलेज जीवनापासून ते गावचे सरपंच होणे, ग्रामपंचायतीचे सदस्य होणे व त्याचबरोबर केक शॉपमध्ये आपण कशा पद्धतीने प्रगती केली आहे याचा प्रवास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवला. एमपीएससी परीक्षा दोन वेळा देऊन अपयश आलं तरी भविष्यामध्ये मी निश्चितच पुन्हा एकदा प्रयत्न करेल असा आशावाद ही मनिषा भोईर यांनी व्यक्त केला.

 


           प्रमिला कडू यांनी शाळेमध्ये विविध प्रकारचे सुरू असलेल्या उपक्रमाचे कौतुक करून सर्व शिक्षकांचा कौतुक केलं. तर पंचायत समिती सदस्य ललिता पाटील यांनी मला जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे सातत्याने यायला सातत्याने आवडते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना या ठिकाणी वाव दिला जातो, असे उद्गार काढले.
            यानंतर विजयी स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय अशी २१ बक्षीसे यावेळी वाटण्यात आली. नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमाची संकल्पना केंद्र शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांची होती, या कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन आणि नियोजन शिक्षका अनघा दळवी, सध्या जगताप, रसिका पाटील, चित्रा पाटील यांनी केले होते. गेले नऊ दिवस नवरात्र उत्सवामध्ये राहनाळ शाळा नारी शक्तीने भारावून गेली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रा पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन आनघा दळवी यांनी केले.

Post a Comment

0 Comments